Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeशेतीपद्धत बदलल्यामुळे तोट्यातील शेतकरी झाला मालामाल मेहनतीच्या जोरावर कैलास आंधळे यांनी कमवले...

पद्धत बदलल्यामुळे तोट्यातील शेतकरी झाला मालामाल मेहनतीच्या जोरावर कैलास आंधळे यांनी कमवले लाखो रुपये

अक्षय विधाते | आष्टी

शेतकर्‍यांना कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टीला सामोरे जावे लागत आहे. या संकटाचा सामना करताना शेतकरी पुरते निराश होऊन अनेकांनी आत्महत्या देखील केल्या आहेत.परंतु शेतक-यांनी खचून न जाता हताश न होता जिद्द व मेहनतीच्या जोरावर पारंपारिक शेती न करता आधुनिक पद्धतीने परदेशी भाजीपाला फळबाग पॉलीहाऊस,शेडनेट यामध्ये पिके घेतली तर शेतकरी मालामाल होऊ शकतो यासाठी सरकार ही मोठ्या प्रमाणावर अनुदान देत आहे.या सरकारच्या योजनांचा पुरेपुर फायदा घेत आष्टी तालुक्यातील आंधळेवाडी येथील शेतकरी कैलास आंधळे यांनी शेतात वेगवेगळे प्रयोग करून लाखो रुपये कमवत आहेत. त्यांची शेती इतर शेतकर्‍यांसाठी प्रेरणादायी आहे.त्यांचा आदर्श घेऊन शेतक-यांनी शेती केली तर नक्कीच तुम्ही पण मालामाल व्हाल.
आष्टी सारख्या कायम दुष्काळी असलेल्या तालुक्यात आंधळेवाडी येथील शेतकरी कैलास आंधळे यांनी मनाची जिद्द आवड असल्यामुळे त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये जे प्रयोग केले त्यातून त्यांनी लाखो रुपये कमवून यशस्वी ठरले त्यांची जवळपास ७५ एकर शेती आहे.आंधळे यांनी जेव्हा शेती करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांनी शेतीमध्ये पारंपरिक पीक घेतले होते मात्र त्यामधून त्यांना जास्त उत्पन्न भेटत न्हवते. यावर त्यांनी चांगला अभ्यास केला आणि आधुनिक पीक घेण्याचे ठरवले, त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये अनेक वेगळे वेगळे प्रयोग करण्याचे ठरवले त्यांनी शेतकरी विशेष कार्यक्रम मार्गदर्शन घेण्यासाठी पुणे,बारामती,मुंबई बाहेरील शहरातील प्रगतशील शेतकरी कृषी अधिकारी यांच्याशी जवळीक करून मार्गदर्शन घेतले आणि आंबा,आवळा,चिकू,पेरु,पालेभाज्या,बरोबरच १ एकरमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत शेडनेट उभारुन रंगीत ढोबळी मिरची यातून २५ टन मिर्ची पासून २० लाख रुपये उत्पन्न मिळवले त्यांनी ४ एकर द्राक्षे लागवड केली आहे.पहिलीच वेळ असल्याने बाग जोमात असून फळधारणा मोठ्या प्रमाणावर झाली असल्याने यातून त्यांना ३० ते ४० लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.डाळींब ८ एकर असून यातून ते वर्षाकाठी १० ते १५ लाख रुपये कमवतात,केशर आंबा ५०० झाडे ५ एकरमध्ये आहे.हे ही भरघोस उत्पन्न होत आहे.आवळा ५ एकर, चिकु ५ एकर, पेरू तैवान व सरदार या वाणांचे त्यांनी चालू वर्षात ७ ते ८ टन उत्पन्न घेतले आहे.याच पद्धतीने दोडके, मिरची, टोमॅटो,बटाटा,रेड कॅबरीज,भेंडी यांची सुद्धा लागवड केली. त्यांनी हे सर्व क्षेत्र बागायती करण्यासाठी सिंचन व्यवस्था ४ विहीर,३ बोअरवेल,३ शेततलाव,१०० बाय १०० मी.२ कोटी ९० लाख पाणी क्षमता,४४-४४-३ मी.१ कोटी ७० लाख पाणी क्षमता,३०-३०-३ मी.७० लाख लिटर पाणी क्षमता असलेले तलाव असून शासकीय योजनांचा पुरेपूर फायदा घेत उत्पन्न मिळवत आहेत. ते स्वतः शेतात दारेबरोबर शेतीची सर्व कामे कुटुंबाच्या मदतीने करतात शेतीला जोडधंदा म्हणून गणेश कलेक्शन नावाचे जामखेड येथे कापड दूकान,दुग्धव्यवसायाची जोड देखील आहे.नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत देण्यात येणारा निधी देण्यास विलंब होत आहे.तो तात्काळ द्यावा,रंगित ढोबळी मिरची अनुदान पूर्ववत करण्यात यावे,शेडनेट पॉलिहाऊस क्रॉसनाम जूना आहे तो वाढवून द्यावा असे प्रगतशील शेतकरी कैलास आंधळे यांनी सांगितले त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिद्द व मेहनत केल्यास लाखो रुपये शेतीतून कमवता येतील.

शेणखतासाठी ३० ते ३५ जणावरे
शेणखत हे पारंपारिक सेंद्रिय खत असल्यामुळे मुळे आपल्या शेतात स्वतःचे नत्र,स्फुरदव पालाश असल्यामुळे पिकाला नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात खायला मिळते यामुळे वाढ होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होते.जमिनीमध्ये जीवाणूचा संख्या वाढवण्यासाठी सेंद्रिय शिवाय पर्याय नाही यामुळे शेणखतासाठी ३० ते ३५ जनावरे देखील सांभाळत आहेत.

रंगीत ढोबळी मिर्ची चे २० लाख रुपये उत्पन्न तर द्राक्षाचे ३० ते ४० लाख उत्पन्न अपेक्षित
१ एकरचे शेडनेट त्यामध्ये रंगीत ढोबळी मिर्ची,द्राक्षे ४ एकर, डाळिंब ८ एकर, आंबा ५ एकर, आवळा ५ एकर, चिकू ५ एकर, पेरु ५ एकर ७ ते ८ टन घेतले उत्पन्न,७५ एकर क्षेत्र सिंचनासाठी ३ शेततलाव,४ विहीर,३ बोअरवेल

तरुणांनो, नौकरीच्या मागे धावणे सोडा शेती व्यवसायाकडे वळा
शाळेत शिक्षण घेणार्‍या बर्‍याच विद्यार्थांचे ध्येय नोकरीच असते पण जर नोकरी मिळत नसेल तर तरुणांनी खचून न जाता व्यवसायाकडे वळावे.तरुण शेतक-यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा सरकारने ही निधी कमी पडू देऊ नये परदेशी भाजीपाला दर्जेदार शेती केल्यास ही नौकरदारापेक्षा ही जास्त कमवू शकतो तरुणांनी राजकारणाकडे वळूच नये

-कैलास आंधळे
(प्रगतशील शेतकरी,आंधळेवाडी)

६ भावांचे एकत्रित कुटुंब लहान मोठे ३० माणसांच्या
मदतीने शेती

आंधळे यांचे ६ भावांचे कुटुंब असून ३० माणसांच्या मदतीने शेतातील कामे कैलास आंधळे करून घेत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!