गेवराई (रिपोर्टर) गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची तस्करी केली जात असून गेल्या दोन दिवसांपुर्वी याठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी करीश्मा नायर यांनी गोदाकाठच्या गावांना भेटी दिल्या होत्या. यानंतर रात्री त्यांनी सावरगाव, सावळेश्वर व म्हाळसा पिंपळगाव या परिसरातून अवैध वाळू वाहतूक करण्यार्या पाच हायवा ताब्यात घेऊन 2 कोटी रुपयांचा ऐवज जप्त धडाकेबाज कारवाई केली.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या दोन दिवसांपुर्वी गोदाकाठच्या काही गावांत ग्रामसभेनिमित्त अप्पर जिल्हाधिकारी करीश्मा नायर यांनी भेटी दिल्या होत्या तसेच परिस्थिती लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वत; पोलिस प्रशासनासह आज गोदापट्ट्यात छापा मारत ही धडाकेबाज कारवाई केली असून या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान ज्या हायवा गाड्या पकडल्या आहेत त्याच्यांवर यापुर्वीच देखील कारवाई झालेली आसून त्यांना दंड केल्यानंतर शासनाने या गाड्यातून वाळू वाहतूक करता येणार नाही असे पत्र घेतल्यानंतर ही या गाड्या अवैध वाळू वाहतूक करत असल्याची गंभीर बाबही समोर आली आहे. सदरची कारवाई ही अप्पर जिल्हाधिकारी करीश्मा नायर, तहसिलदार संदिप खोमणे, गौणखनिज अधिकारी माधव काळे, मंडळ अधिकारी सुनिल तांबारे, मंडळ अधिकारी अंगद काशिद यांच्यासह आदींनी केली.