Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडमाजलगावच्या हिंदू स्मशानभूमीसह जिजामाता उद्यानाला एक कोटीचा निधी

माजलगावच्या हिंदू स्मशानभूमीसह जिजामाता उद्यानाला एक कोटीचा निधी


नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हाप्रमुखांकडे दिले पत्र
बीड/माजलगाव (रिपोर्टर) नगरपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना मंत्री आपल्या पक्षाकडे लक्ष ठेवून असून ज्या जिल्ह्यात नगर-पंचायतीच्या निवडणुका होत आहेत त्या जिल्ह्यातील नगर-पंचायतींसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवात केली असून माजलगाव शहरातील मंगलनाथ हिंदू स्मशानभूमीसाठी आणि जिजामाता उद्यानसाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.


माजलगाव येथील मंगलनाथ हिंदू स्मशानभूमी आणि जिजामाता उद्यान व्हावे यासाठी येथील जनता प्रयत्नशील होती. स्मशानभूमीसाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता. गेल्या काही दिवसांपुर्वी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या दोन्ही कामांबाबत शिवसैनिकांकडून पाठपुरावा केला गेला होता. स्मशानभूमी व्यवस्थीत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. अखेर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी २० लाख स्मशानभूमीसाठी आणि ८० लाख जिजामाता उद्यानासाठी दिले. सदरच्या निधीचे पत्र जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्याकडे गेल्या महिन्या-दीड महिन्यापुर्वीच सुपूर्द करण्यात आले आहेत त्यामुळे माजलगाव येथील मंगलनाथ हिंदू स्मशानभूमीसह जिजामाता उद्यानाचा प्रश्‍न काम पुर्णत्वास गेल्यानंतर सुटणार आहे.

Most Popular

error: Content is protected !!