मुंबई (रिपार्टर) प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर होणार्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने ही परवानगी नाकारल्याचे समजते. २६ जानेवारीला राजपथावर होणार्या संचलनात देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी होत असतात. यामध्ये विविध राज्यांच्या चित्ररथांना प्रत्येकवर्षी ठराविक निकषांनुसार संधी दिली जाते.