बीड(रिपोर्टर) बीड शहरातील पेठ बीड भागात राहणार्या एका व्यापार्याने गुजरात राज्यात २५ टन पेंड पाठविली होती. सदरील या पेंडीचे पैसे संबंधितांनी दिले नसल्याने या प्रकरणी दोघा जणांविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश गोविंदप्रसाद शर्मा यांनी कुणाल अग्रवाल व राजमोती कॅटल फिड जसांधन यांचे मालक जितू साकारिया यांच्याशी संगनमत करून कुणाल याने विश्वासात घेत फिर्यादीकडून २५ टन सरकी मागवून घेऊन ती परस्पर राजमोती कॅटलफिड जसांधन यांना विकली व राजमोती कॅटलफिडचे जितू सकारिया यांनी मालाची कोणतीही खातरजमा न करता माल खाली करून घेऊन दोघांनीही फिर्यादीचे २५ टन सरकी पेंडचे एकूण ७ लाख १८ हजार ७५० रुपये दिले नाही. म्हणून कुणाल अग्रवाल व जितू साकरिया यांनी फिर्यादीस विश्वासात घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी सुरेश शर्मा यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.