Wednesday, May 18, 2022
No menu items!
HomeUncategorizedतुमचे आशीर्वाद मतदारसंघातील विकास कामे करण्यासाठी प्रेरणा देतात -आ. क्षीरसागर

तुमचे आशीर्वाद मतदारसंघातील विकास कामे करण्यासाठी प्रेरणा देतात -आ. क्षीरसागर

बीड (रिपोर्टर)- मागील अनेक वर्षापासून बीड शहराचा विकास हा फक्त कागदोपत्री होत होता. मागील निवडणुकीत तुम्ही मला आशिर्वाद दिले. त्या वेळी दिलेल्या आश्‍वासनाची पुर्तता आता मतदारसंघात करत आहे. तुमचे आशिर्वाद विकास कामे करण्यासाठी मला प्रेरणा देत असल्याचे सांगत आ. संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरातील विविध ठिकाणी 2 कोटी 10 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन केले.

बीड शहरातील प्रभाग क्र. 2 मधील सिमेंट काँक्रेय रस्ता, नाली बांधकाम याच वार्डातील अन्य दोन ठिकाणी सिमेंट रस्ता व नालीचे बांधकाम त्याचबरोबर प्रभाग क्र. 6, प्रभाग क्र. 7, 8 मधील सिमेंट रस्ता व नाली बांधकामाचा शुभारंभ आज सकाळी आ. संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी माजी आमदार सय्यद सलीम, सुनिल धांडे, सलीम सारंग यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी आ. क्षीरसागर म्हणाले की, पुर्वी बीड शहरातला विकास केवळ कागदोपत्री होत असायचा. शासनाकडून निधी यायचा मात्र तो प्रत्यक्षात खर्च केला जात नव्हता. निवडणुकीच्या कालावधीमध्ये तुम्ही मला आशीर्वाद दिले. त्यावेळी मी जे आश्‍वासन दिले होते त्या आश्‍वासनांची पुर्तता करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. तुमच्या आशिर्वादामुळे मला नेहमी मतदारसंघातील व शहरातील विकास कामे करण्यासाठी प्रेरणा मिळते, असे या वेळी आ. क्षीरसागरांनी म्हटले.

Most Popular

error: Content is protected !!