Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रशेकापचा लाल तारा निखळला एन.डी.पाटील काळाच्या पडद्याआड

शेकापचा लाल तारा निखळला एन.डी.पाटील काळाच्या पडद्याआड


कोल्हापूर (रिपोर्टर) महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन झालं आहे. ते ९३ वर्षांचे होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी कणकण वाटत होती. त्यामुळे एन.डी. पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र या वयातही एन. डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. मात्र यावेळी त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. एक झुंजार
नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांचे अनेक प्रश्न त्यांनी सातत्यानं मांडले होते. तसेच अनेक प्रश्न त्यांनी मार्गीही लावले होते.
प्रा. एन. डी. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य पुरोगामी चळवळीसाठी खर्च केलं. १५ जुलै १९२९ रोजी सांगली येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला होता. नारायण ज्ञानदेव पाटील असे त्यांचे पूर्ण नाव असून १५ जुलै १९२९ ला सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथे शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला. पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असणार्‍या एन. डी. पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केलं होतं.

राजकीय कारकिर्द
१९४८ : शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
१९५७ : मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
१९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षं महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
१९६९- १९७८, १९८५ – २०१० : शे.का.प.चे सरचिटणीस
१९७८-१९८० : सहकारमंत्री,महाराष्ट्र राज्य
१९८५-१९९० : महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )
१९९९-२००२ : निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार
महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य आणि सीमा चळवळीचे प्रमुख नेते

न्यायासाठी तळमळीने संघर्ष करणारे नेतृत्व -ना.मुंडे
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी एन.डी. पाटील यांच्या निधनाचे वृत्त कळताच ट्विट करूएन भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली. आपल्या ट्विटमध्ये मुंडे म्हणतात, शोषित, वंचितांचा शेतकरी, कष्टकर्‍यांचा आवाज ज्येष्ठ नेते तथा पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. एन.डी. पाटील सरांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. त्यांच्या निधनाने न्यायासाठी तळमळीने संघर्ष करणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले.
गोरगरिबांचा
आवाज विसावला

प्रा.एन.डी.पाटील हे कष्टकरी, कामगार, शेतकरी मजुरांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढले. एकनिष्टपणे ते शेवटपर्यंत शेतकरी कामगार पक्षात राहिले. सहकार मंत्री असताना त्यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी कापूस एकाधिकार योजनासुरू केली. या योजनेमुळे शेतकर्‍यांचा फायदा झाला. ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तालमीत वाढलेले होते. शिक्षणक्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. कुठलेही आंदोलन असो त्या आंदोलनात ते स्वत: सक्रिय सहभाग घेत होते. बीडचे आणि त्यांचे घनिष्ट नाते होते. प्रा.एन.डी.पाटील हे गोरगरिबांचा आवाज होते. तो आवाज आज शमला असून शेकापचा लाल तारा निखळला असल्याची प्रतिक्रिया शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभिषण थावरे यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!