Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडभरदिवसा घर फोडून पाऊन लाखाचा मुद्देमाल लंपास

भरदिवसा घर फोडून पाऊन लाखाचा मुद्देमाल लंपास


बीड (रिपोर्टर) घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दरवाज्याचे कुलूप तोडून घरातील नगदी रोख रकमेसह सोन्या-चांदीचा असा एकूण पाऊन लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना काल दुपारी पाटोदा तालुक्यातील कोतन येथे घडली.

रुखसाना पटेल पठाण (रा. कोतन ता. पाटोदा) यांनी अंमळनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, काल दुपारी अडीच वाजता त्या घरी नसताना अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटात व धान्याच्या कोटीत ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ७३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!