जवळपास १ तास बीड- सोलापूर महामार्गावर गोंधळ
पैशाच्या देवाण घेवाणीवरून गुंडागर्दीबीडमध्ये खळबळ
बीड (रिपोर्टर) पैशाच्या देवाणघेवानी वरून एका तरुणास, एकाच कुटुंबातील एका महिलेसह दोघांनी भररस्त्यात फ्री स्टाईल मारहाण केलीये. ही घटना बीड-सोलापूर महामार्गावरील रौऊळगाव चौकात, आज सकाळी साडे नऊच्या दरम्यान घडली आहे. जवळपास १ तास चाललेल्या गोंधळाने महामार्गावर मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी पाहायला मिळाली.
बीड-सोलापूर महामार्गावरील अंजनवती येथील एका तरुणाकडे त्याचपरिसरातील वाणगाव येथील व्यक्तीचे पैसे आहेत. मात्र आज हे पैसे वसूल करण्यासाठी, या एकाचं कुटुंबातील तिघांनी हद्दचं पार केली. आणि तिघांनी मिळून बीड- सोलापूर महामार्गावरील रौऊळसगाव चौकात फ्री स्टाईल मारहाण केली. विशेष म्हणजे यावेळी संबंधित महिलेने त्या तरुणाला दगडाने देखील मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हा प्रकार जवळपास एक तास सुरूच होता. यामुळे पाहणार्यांची मोठी गर्दी जमली होती. तर यावेळी अनेकांनी सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला, मात्र काही केल्या हे तिघे ऐकत नसल्याचे पाहायला मिळालं.