बीड (रिपोर्टर) शिवाजीनगर पोलिसांनी काळ्या बाजारात जाणारा ३० टन तांदुळ दोन दिवसांपुर्वी जालना रोडवर पकडून जप्त केला होता. या तांदळाची अद्यापही पुरवठा विभागाने चौकशी केली नाही. रात्री तहसीलदारासह इतर कर्मचारी शिवाजीनगर ठाण्यात आले होते. मात्र अंधार असल्याने ते परत गेले व सकाळी येतोत म्हणून पोलिसांनी सांगितले. आज दुपारपर्यंत महसूल विभाग पंचनामा करण्यासाठी आलेला नव्हता.
बीड येथून गुजरातकडे एका ट्रकमधून ३० क्विंटल तांदुळ जात होता. शिवाजीनगर पोलिसांनी सदरील तांदुळ जालना रोडवर पकडून तांदूळसह ट्रक जप्त केला होता. या प्रकरणाची अजून पुरवठा विभागाने कसलीही चौकशी केली नाही. रात्री पुरवठा विभागाचे डोकेसह कर्मचारी शिवाजीनगर ठाण्यात आले होते. अंधारात कसा पंचनामा करणार? असा प्रश्न त्यांना विचारल्यानंतर पुरवठा विभाग सकाळी येतो म्हणले होते मात्र आज दुपारपर्यंत पुरवठा विभागाचे अधिकारी पंचनामा करण्यासाठी आलेले नव्हते. तांदळाचा पंचनामा करण्याबाबत पुरवठा विभागच उदासीन आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.