Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडआ.संदीप क्षीरसागरांच्या माध्यमातून बीड शहरात विकास कामांचा धडाका

आ.संदीप क्षीरसागरांच्या माध्यमातून बीड शहरात विकास कामांचा धडाका


पेठ बीड भागात २ कोटींच्या विकास कामांचे भूमिपुजन
बीड (रिपोर्टर) गेल्या अनेक वर्षात जी विकास कामे झाली नाहीत ती विकास कामे पुर्ण करण्यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करत आहेत. कठीण परिस्थितीत मोठ्या प्रमाणात आ.संदिप भैय्या क्षीरसागर बीड मतदार संघासाठी निधी खेचून आणत आहेत. काल २ कोटी रूपयांच्या विकास कामांचे नारळ फोडल्यानंतर आज पुन्हा पेठ बीड भागातील प्रभाग क्र.४, १८ व १९ व इतर भागात २ कोटी १६ लक्ष रूपयांच्या विकास कामांचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक व मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे यांची विशेष उपस्थिती होती.


मंगळवार दि.१८ जानेवारी २०२२ रोजी पेठ बीड भागातील प्रभाग क्र.४, १८ व १९ या भागात शासनाच्या विविध योजनाच्या माध्यमातून आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून २ कोटी १६ लक्ष रूपयांच्या रस्ता, नाली बांधकाम या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, बहिरवाडीचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादीचे नेते आसारामभाऊ गायकवाड, वैजीनात नाना तांदळे, बबन गवते यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आलेल्या विकास कामांमध्ये प्रभाग क्र.४ मधील तुळजाभवानी मंदिर ते अशोक वाघमारे, डोंगरे ते मच्छिंद्र वडमारे व सुमित वडमारे ते बबन जोगदंड यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे २५ लक्ष रूपये, प्रभाग क्र.४ मध्ये ताठे यांचे घर ते सार्वजनिक शौचालय व बबन रेगुडे यांचे घर ते दिलीप कांबळे यांच्या घरापर्यंत (नागोबा गल्ली) सिमेंट कॉंक्रेट रस्ता व नाली बांधकाम करणे ५० लक्ष ८० हजार रूपये, प्रभाग क्र.४ मध्ये चंद्रकांत कदम यांचे घर ते आंबेडकर सभागृहापर्यंत व दत्ता खडके ते पेठ बीड पोलीस स्टेशन रोडपर्यंत (वीरशैव कॉलनी) सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे ३७ लक्ष २० हजार रूपये, प्रभाग क्र.४ मध्ये हिरामन गायकवाड ते कांबळे यांचे घरापर्यंत (रमाईनगर) व बंडु निसर्गंध यांचे घर ते नाथापुर रोड रेणुकानगर पर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे ३२ लक्ष ८० हजार रूपये, प्रभाग क्र.१७ मधील सुभाष कॉलनी येथे पोपट गायकवाड यांचे घर ते चाऊस यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे २५ लक्ष रूपये, १.प्रभाग क्र.१७ मधील सुभाष कॉलनी येथे पोपट गायकवाड यांचे घर ते चाऊस यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे २० लक्ष, प्रभाग क्र.१९ मधील राजु वाघमारे ते संतोष जाधव यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे २५ लक्ष रूपये या कामांचा समावेश आहे.

Most Popular

error: Content is protected !!