बीड (रिपोर्टर): पक्षाच्या अडचणीच्या काळात जनता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभा असल्याचे प्रतिपादन जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी केले. सातपुते यांच्या हस्ते पाटोदा तालुक्यात अकरा शाखेंचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला तालुक्यातील पदाधिकार्यांची व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपर्कप्रमुख सुनील प्रभू, उपनेत्या सुषमा अंधारे, मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेहरकर, जिल्हा संपर्कप्रमुख पोतदार, लोकसभा प्रमुख माजी आ. सुनील धांडे, सहसंपर्कप्रमुख बदामराव पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा तालुक्यात जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी अकरा शाखांचे उद्घाटन केले. तालुक्यातील सोनेगाव, लऊळ वस्ती, गोरे निवास यासह आदी ठिकाणी शाखा उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला शहरप्रमुख शेख निजाम, रतन गुजर, आजिनाथ खेडकर, मुकुंद शिंठदे, आजिंक्य डोरले, कृष्णा चौरे, मारुती गिरी, संजीव भारती, विनोद पाटील, किरण चौरे, अक्षय चौरे, विष्णू शितोडे, सुरज गवळी, महादेव डोरले, अभिजीत लऊळ, विनायक लऊळ, मानेश्वर लऊळ, बालासाहेब जाधव यांच्यासह आदींची उपस्थिती होती.