Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रतुमको मिर्ची लगीं तो मैं क्या करूँ!; उर्मिला ट्वीट कुणासाठी?

तुमको मिर्ची लगीं तो मैं क्या करूँ!; उर्मिला ट्वीट कुणासाठी?

मुंबई: शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी लगेचच कामाचा धडाका सुरू केल्याचेही पाहायला मिळत असून या धामधूमीत त्यांनी केलेले एक ट्वीट सर्वात लक्ष्यवेधी ठरले आहे.


उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशावर टीका होऊ लागली आहे. उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना केलेली वक्तव्ये, लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेच्या मुंबई पालिकेतील कारभारावर केलेली टीका, याचे व्हिडिओ विरोधकांकडून व्हायरल करण्यात येत आहेत. त्यात भाजपचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही शिवसेनेवर निशाणा साधला आहे. उर्मिला यांना पक्षात घेऊन शिवसेनेने पक्षातील लढवय्या महिला कार्यकर्त्यांचंच अवमूल्यन केलं आहे, अशी तोफ दरेकर यांनी डागली आहे. दुसरीकडे उर्मिला यांना सोशल मीडियातही ट्रोल करण्यात येत आहे. या सर्वावर उर्मिला यांनी शिवसेनेच्या स्टाइलमध्येच प्रत्युत्तर दिले आहे.

उर्मिला यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत ‘झणझणीत’ ट्वीट केलं आहे. ‘तुमको मिर्ची लगीं तो मैं क्या करूँ’, हे गाणे मला खूप आवडते. तुम्हाला काय वाटते?’, असे ट्वीट करत उर्मिला यांनी विरोधक आणि ट्रोलर्सचा खरमरीत समाचार घेतला आहे. उर्मिला यांचं हे ट्वीट सध्या चर्चेचा विषय बनलं आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!