बीड (रिपोर्टर) तिसर्या लाटेत बीडमध्ये कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आठ दिवसाच्या आत कोरोना रूग्णसंख्या २०५ च्या पुढे गेली आहे. हाच आकडा गेल्या आठ दिवसापूर्वी दहाच्या आत होता. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या अनेक पटीने वाढू लागली आहे. आज आरोग्य विभागाला २२७७ संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल २०५ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर २०७२ जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ३८, आष्टी ४, बीड ७७, धारूर ११, गेवराई १०, केज १०, माजलगाव १३, परळी २२, पाटोदा ८, शिरूर ८ आणि वडवणी तालुक्यात ४ रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या दहा दिवसात रूग्णांची संख्या वाढल्याने बीडमध्ये उपचाराखालील रूग्णांची आकडाही वाढला असून कालपर्यंत तो ५४१ इतका होता. आज त्यामध्ये २०५ रूग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यात २८४५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर १,०१,१०४ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.