माजलगाव (रिपोर्टर)- कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बाजारासह गर्दीचे ठिकाण पुर्णत: बंद करण्याचे आदेश दिलेले असताना जिल्ह्यात अनेक ठिकाणी आजही आठवडी बाजार भरतात. आज सकाळी माजलगाव येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांनी बाजार उठवण्याचा प्रयत्न केला असता भाजीपाला विक्रेत्यांसह व्यापारी आणि प्रशासनातील अधिकार्यात तू तू मै मै होत शेतकर्यांनी अख्खा बाजार रस्त्यावर फेकून प्रशासनाचा निषेध केला.
माजलगाव येथे आज सकाळी आठवडी बाजार भरला होता. नगरपालिकेचे मुख्याधिकारी पोलिसांसह बाजार तळावर आले. उपस्थित व्यापार्यांसह फळभाजी विक्रेत्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. या वेळी प्रशासनातील अधिकारी आणि फळ भाजी विक्रेत्यात काही काल वाद सुरू झाला. प्रशासनाने बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी संतापलेल्या शेतकर्यांसह फळभाजी विक्रेत्यांनी आपल्या जवळील सर्व भाजीपाला रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त करत प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली.