Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeक्राईममहिलेच्या गळ्यातील गंठण पळवले शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

महिलेच्या गळ्यातील गंठण पळवले शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल


बीड (रिपोर्टर) शहरातील तक्षशिला नगर नालंदा कॉलनीत एका महिलेच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. ही घटना दिवसा ढवळ्या घडली असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाकल करण्यात आली आहे.


विशाखा मधुकर चक्रे या काही महिलांसमवेत बोलत असताना पाठीमागून धूम स्टाईलने आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून पळ काढला. सदरील हे गंठण तीन तोळ्याचे होते. या प्रकरणी महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!