सतीश मुरकुटे | शिरूर
शिरूर नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी दोन टप्प्यात झालेल्या मतदानाची आज मतमोजणी केल्यानंतर पुन्हा शिरूरची नगरपंचायत विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात गेली असून राष्ट्रवादीला या ठिकाणी जबरदस्त धक्का बसला तर शिवसेनेला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. याठिकाणी भाजपा ११ जागांवर दणदणीत विजय मिळवून गुलालाची उधळण करत आहे तर राष्ट्रवादी केवळ ४ जागांवर समाधान मानत आहे.
शिरूरची नगरपंचायत आपल्याच ताब्यात यावी यासाठी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी मोठा प्रचार याठिकाणी केला होता. याविरुद्ध आ. सुरेश धसांनी आक्रमक प्रचार आणि विकासाचे मुद्दे समोर मांडले होते. दुसरीकडे शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनीही याठिकाणी आपली प्रतिष्ठा पणाला लावत शिवसेनेकडून ११ उमेदवार रिंगणात उतरवले होते. १७ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत दोन टप्प्यात मतदान झाले. आज सकाळी प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीपासूनच भाजपाच्या उमेदवाराने आघाडी घेतल्याचे पाहावयास मिळाले. सरशेवटी भाजपाला ११, राष्ट्रवादीला ४ तर शिवसेनेला २ जागा मिळाल्या. शिरूर नगरपंचायत बहुमतात भाजपाच्या ताब्यात गेली. पुन्हा एकदा विधान परिषदेचे आमदार सुरेश धसांनी शिरूरमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवलं.
शिरूर कासार नगरपंचायत निवडणूक २०२२
वॉर्ड क्रं १ १)बबनराव घोरपडे (राष्ट्रवादी) -१०१
२)भागवत थोरात (भाजप)-विजयी १४१
३)गोकुळ थोरात (शिवसेना) -१२
वॉर्ड क्रं. २ १) शिवराम कातखडे (राष्ट्रवादी) -विजयी १४४
२)अन्वर शेख (भाजप)-५६ ३)प्रा.वसंत काटे (शिवसेना)-४७
वॉर्ड क्रं. ३ १)शरद पवार (राष्ट्रवाद)-११७ २)दत्तात्र्ये गाडेकर (भाजप)-विजयी १४८३)कैलास गायके (शिवसेना)-३५ वॉर्ड क्रं. ४ १)संगीता झिरपे (राष्ट्रवादी)-१२० २)वैजंता मुरलीधर तळेकर (भाजप) -विजयी १२६ ३)शानूरबी गुलाबं शेख (शिवसेना)-२१ वॉर्ड क्रं. ५ १)सुनील वसंत पाटील (भाजप)-७६२)अर्जुन गोपीनाथ गाडेकर (शिवसेना)-७९३)सुनील पांडुरंग गाडेकर (राष्ट्रवादी)-३२ वॉर्ड क्रं.६
१)गणेश अशोक भांडेकर (भाजप)१५५ २)शेख शब्बीर बाबू (कॉंग्रेस) ००
३)शांतीलाल माणिकचंद चोरडिया (राष्ट्रवादी) ४३ वॉर्ड क्रं ७ १)संगीता संतोष भांडेकर (राष्ट्रवादी पुरस्कृत)१०४ २)प्रतिभा रोहिदास पाटील (भाजप)१११
वॉर्ड क्रं.८ १)प्रांजली सागर भांडेकर (शिवसेना पुरस्कृत)-८२
२)शितल बाळासाहेब गायकवाड (राष्ट्रवादी) -१८
३)संगीता सुभाष गाडेकर(भाजप)११४
वॉर्ड क्रं.९
१)सगिरा रहेमान शेख (राष्ट्रवादी)-७४
२)स्वाती सागर केदार (शिवसेना)-१८
३)प्रियंका सागर उटे(भाजपा)-७५
वॉर्ड क्रं.१०
१)अनुराधा आनंद जावळे (भाजप)-३१
२)अमृता अमोल चव्हाण (राष्ट्रवादी)-१२६
३)प्रियदर्शनी युवराज सोनवणे(शिवसेना)-२६
वॉर्ड क्रं.११
१)शेख नसीर शायनाज (राष्ट्रवादी)-१४९
२)शेख शमा युनूस (भाजपा)- ११५
३)हमिदा नबाब पठाण (शिवसेना)-२१
वॉर्ड क्रं १२
१)गयाबाई शिवाजी काटे (राष्ट्रवादी)-५४
२)सुनीता अक्षय रणखांब (शिवसेना)-९८
३)उज्ज्वलाबाई विश्वास ढाकणे (भाजप)-९०
वॉर्ड क्रं.१३
१)श्वेता प्रकाश देसरडा (भाजप)-१५०
२)मंदा मारोती गायके (राष्ट्रवादी)-५६
वॉर्ड क्रं १४
१)महेश औसरमल (शिवसेना)-२२
२) सुनील भंडारी (राष्ट्रवादी)-५५
३)मोहिनी अरुण भालेराव (भाजप)-७४
४)अजिनाथ सोमनाथ सूर्यवंशी (अपक्ष)-५५
वॉर्ड क्रं १५
१)गयाबाई शशिकांत पानसंबळ (भाजप)-८५
२)गयाबाई शहादेव गायकवाड (राष्ट्रवादी)-१२८
३)शेख जायदा मैनूद्दीन (शिवसेना)-८६
४)शेख समिना असिफ(कॉंग्रेस)-०७
वॉर्ड क्रं.१६
१)दिनेश गाडेकर (राष्ट्रवादी)-२२०
२)भगवान सानप (भाजपा)-२५३
वॉर्ड क्रं १७
१)प्रणव मंगरूळकर (राष्ट्रवादी)-१११
२)उद्धव घोडके (भाजपा)-१९३
भाजपा -१७ पैकी-११
राष्ट्रवादी – १६ पैकी -०४
शिवसेना -११ पैकी -०२
कॉंग्रेस -२ पैकी-००
अपक्ष -३पैकी ००