Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडआष्टीआष्टी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा तर महाविकास आघाडीला ३ जागा, आ. धसांनी गड...

आष्टी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा तर महाविकास आघाडीला ३ जागा, आ. धसांनी गड राखला तब्बल १२ जागा जिंकत सरशी


अक्षय विधाते| आष्टी
आष्टी नगरपंचायत निवडणूक या वर्षी भाजपचे आ. सुरेश धस, मा.आ.भिमरावजी धोंडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष युवा नेते सतिश शिंदे यांच्यामुळे संपूर्ण राज्यभर गाजली होती.या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे केवळ जिल्ह्याचे नाही तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.अखेर भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आ. सुरेश धस, मा.आ.भिमरावजी धोंडे यांनी तब्बल १२ जागेवर विजय मिळवत भाजपचा झेंडा फडकावला आहे.तर विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने ३ जागा मिळवल्या आहेत. तर अपक्ष २ उमेदवारांनी बाजी मारली आहे.

आष्टी नगरपंचायत निवडणुक चुरशीची झाली होती.महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता.दरम्यान भाजपने १२ जागेवर विजय मिळवत महाविकास आघाडीला दे धक्का दिला विद्यमान आ. बाळासाहेब आजबे यांनी महाविकास आघाडीला सोबत घेत प्रचारात मुसंडी मारली होती.परंतु आ. सुरेश धस यांच्या विकासकामामुळे आ. बाळासाहेब आजबेंना नाकारुन पुन्हा एकदा आष्टीकरांनी भाजपच्या हातात एकहाती सत्ता दिली असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून जेसीबीच्या सह्याने गुलालाची उधळण फटाके फोडून ढोलताशे वाजत आ. सुरेश धस यांच्या निवासस्थानी आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
आष्टी नगरपंचायतीवर भाजपचा
आ. धस,धोंडेंच्या विकास कामामुळे आष्टी करांची भाजपला पसंती
मागिल कित्येक वर्षांपासून रखडलेला आष्टी च्या विकास कामाचा रखडलेला प्रश्न रस्ते,भुयारी गटार,घरकुल,पाणी पुरवठा,पेव्हींग ब्लॉक,धार्मिक स्थळांचा विकास आदी कामे मार्गी लावल्याने आष्टी करांनी पुन्हा एकदा आ. सुरेश धस,मा.आ.भिमरावजी धोंडे यांच्याकडे एकहाती सत्ता सोपवली आहे.
वार्ड – १ सुरेखा शाम वाल्हेकर ( भाजप)
वार्ड -२ शैलेश सहस्त्रबुद्धे ( भाजपा )
वार्ड – ३ भारत मुरकुटे ( भाजपा )
वार्ड – ४ पठाण नूरजहाबी नवाबखान ( भाजपा )
वार्ड – ५ विमल विजय सुरवसे ( राष्ट्रवादी)
वार्ड – ६ शारमीन ताजोद्दीन शेख ( भाजपा)
वार्ड – ७ फतेमाबी हारुण शेख ( अपक्ष)
वार्ड – ८ ज्ञानदेव राऊत ( अपक्ष)
वार्ड – ९ शमीन शेख ( अपक्ष )
वार्ड – १० अक्षय धोंडे ( भाजप पुरस्कृत )
वार्ड -११ नाजीम शेख ( राष्ट्रवादी)
वार्ड – १२ बेग मिर्झा आयशा इनायतुल्ला ( भाजपा )
वार्ड -१३ सुरेश वारंगुळे ( भाजप पुरस्कृत )
वार्ड – १४ किशोर झरेकर ( भाजपा)
वार्ड -१५ रेडेकर पंखाबाई ( भाजपा)
वार्ड – १६ पल्लवी धोंडे ( भाजपा )
वार्ड -१७ महादेव शिखरे ( कॉंग्रेस )

शिवसेनेवर नामुष्की; काही ठिकाणी
डिपॉझिटि जप्त

राज्याचं नेतृत्व करणार्‍या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला बीड जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीत अक्षरश: तोंड लपवावं लागलं. वडवणी, केज येथे शिवसेना उमेदवारांचे डिपॉझिट पुर्णत: जप्त झाले तर आष्टी, पाटोदा या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार दिसून आले नाहीत. शिरूरमध्ये १७ पैकी केवळ ११ जागांवर शिवसेनेने निवडणूक लढविली. या ठिकाणी केवळ शिवसेनेला दोन जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे शिवसेना बीड जिल्ह्यात बॅकफुट असल्याचे दिसून आले.

Most Popular

error: Content is protected !!