Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडपाटोदाआ. सुरेश धस गटाचे एकहाती वर्चस्व

आ. सुरेश धस गटाचे एकहाती वर्चस्व

सोमनाथ कोल्हे| पाटोदा
पाटोदा नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक दिनांक २१/१२/२०२१ रोजी तेरा प्रभागाची तर दिनांक १८/१/२०२२ रोजी चार प्रभागाची निवडणूक होऊन आज दिनांक १९/१/२०२२ रोजी निकाल जाहीर झाला असुन या निवडणुकीत पंकजाताई मुंडे राष्ट्रीय सचिव भाजपा तथा मा.पालकमंत्री,मा.आ.भिमराव धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व आ.सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाकडून लढली गेली तर आ.बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली व रामकृष्ण बांगर,आप्पासाहेब राख,जुबेर चाऊस,भुषण दादा जाधव, सौ.सत्यभामाताई बांगर,गणेश कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांनी लढवली.या मध्ये दोन्ही आमदारांनी आपली ताकद लावून प्रचार केला.यामध्ये भाजपाचे नऊ तर
आ.सुरेश धस यांना मानणारे अपक्ष पाच असे मिळून पंधरा,कॉंग्रेस एक तर राष्ट्रवादी एक असे उमेदवार निवडून आले आहेत.


प्रभाग क्रमांक एक झालेले एकुण मतदान ४९१ पैकी अडागळे किशोर परमेश्वर भाजपा २७४ विजयी तर जावळे दादाराव लक्ष्मण राष्ट्रवादी २०६ तर उपदेशी किशोर सुरेश रासपा, ७,,प्रभाग क्रमांक दोन एकुण झालेले मतदान ८०८ पैकी भाकरे शितल विष्णु भाजपा २३३,जाधव बदामबाई शहाजी अपक्ष २१७,काळे अश्विनी हनुमंत अपक्ष ३०० विजयी तर भाकरे कोंताबाई रघुनाथ राष्ट्रवादी ५६,प्रभाग क्रमांक तीन एकुण झालेले मतदान ८३३ पैकी बामदळे शरद ज्ञानोबा भाजपा ३२६ विजयी,बामदळे नितीन उद्धवराव राष्ट्रवादी २४१,गिरी मारोती रामभाऊ शिवसेना २६०,प्रभाग क्रमांक चार एकुण झालेले मतदान ६६८ पैकी जाधव महादेव बाबासाहेब भाजपा ५०२ विजयी तर जाधव नितीन उद्धव राष्ट्रवादी १६३,प्रभाग क्रमांक पाच एकुण झालेले मतदान ३९४ पैकी वाघमारे निलावती कुंडलीक भाजपा १६१विजयी,नारायणकर हेमा शशिकांत राष्ट्रवादी १३२,नारायणकर अनिता संदीप ५४,जावळे अनिता सुनिल वंचित बहुजन आघाडी ९,जावळे मंगल दिनकर अपक्ष १५,तांबे आशा प्रकाश शिवसेना १४तर डीडुळ मुद्रुकाबाई भीवा अपक्ष ८,प्रभाग क्रमांक सहा एकुण झालेले मतदान ७५४ पैकी गिते रोहीदास विश्वनाथ भाजपा ५३८विजयी,गिते रामदास भिमराव अपक्ष १४४,घुगे अबलुक हिराजी राष्ट्रवादी ३८, गिते चांगदेव गौतम शिवसेना २८ तर गिते चंद्रकांत सुभाष ५, प्रभाग क्रमांक सात एकुण झालेले मतदान ५४१ पैकी कोठेकर जयश्री सुशील भाजपा १५२,सय्यद शहानुर बानो वहाब राष्ट्रवादी १३१,जाधव निर्मला संतोष अपक्ष १६५ विजयी तर जाधव श्वेता अक्षय अपक्ष ९२,प्रभाग क्रमांक आठ एकुण झालेले मतदान ८६१ पैकी शेख आसिफ अब्दुल्लाही आ.धस समर्थक ४८६ विजयी,
शेख राबिया नुर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस २४१ तर शेख रजिया अब्दुल्ला अपक्ष १३०,प्रभाग क्रमांक नऊ एकुण झालेले मतदान ६३८ पैकी नाईकनवरे अहिल्याबाई शहाजी भाजपा १३८, नाईकनवरे सविता संतोष भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस १९७,गोरे आरती रामेश्वर अपक्ष २६४विजयी,काशिद कल्पना कैलास शिवसेना २६ तर जेधे उषा गोविंदराव अपक्ष ५, प्रभाग क्रमांक दहा एकुण झालेले मतदान ७१६ पैकी कांकरिया संजय संपतलाल भाजपा १९८,मकराणी उमर जुबेर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ४४०विजयी तर शिंदे मुकुंद दादाराव शिवसेना ७३,प्रभाग क्रमांक अकरा एकुण झालेले मतदान ५५५ पैकी जाधव दिपाली राजेंद्र भाजपा ३१६ विजयी, जाधव सर्वशाला बप्पासाहेब राष्ट्रवादी २२८ व देशमुख शिल्पा शरद १६,प्रभाग क्रमांक बारा एकुण झालेले मतदान ४४४ पैकी जाधव मंगल भिमराव भाजपा १४८,जाधव राजश्री आसाराम राष्ट्रवादी २०६ विजयी,जावळे हिराबाई नवनाथ वंचित बहुजन आघाडी ८८ व सय्यद हमीदाबी मुक्तार ०२,प्रभाग क्रमांक तेरा एकुण झालेले मतदान ६४७ पैकी पोटे बळीराम बाबासाहेब भाजपा ४३३ विजयी, व राऊत राजेंद्र जानु राष्ट्रवादी २११,प्रभाग क्रमांक चौदा एकुण झालेले मतदान ७७७ पैकी सय्यद अब्दुल्ला स.यासीन भाजपा ४६१ व जाधव सुवर्णा सुनिल राष्ट्रवादी ३०७, प्रभाग क्रमांक पंधरा एकुण झालेले मतदान ५२८ पैकी पठाण शाहीनबी मज्जीतखा आ.सुरेश धस समर्थक ४४१ विजयी, व पोकळे निला सुनिल राष्ट्रवादी ८५ , प्रभाग क्रमांक सोळा एकुण झालेले मतदान ५६४ पैकी सय्यद खातीजाबी अमर आ.सुरेश धस समर्थक ३६९ विजयी,शेख फरजाना हमीद राष्ट्रवादी १३७ व खान मैमुना जफर अपक्ष ५१,प्रभाग क्रमांक सतरा एकुण झालेले मतदान ८५३ पैकी गिते पाटील अनिता श्रीहरी भाजपा २५१ विजयी,जाधव अस्मिता सतीश अपक्ष २२८,देशमुख व्दारकाबाई बालासाहेब भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस २०५ व कदम विजया आबासाहेब अपक्ष १६२ असे मते पडली असुन विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करुन जल्लोष साजरा केला आहे.या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी इंद्रजित गरड,विष्णु सांगळे,नसिर सय्यद,गणेश पगारे,सलीम साहेब,पिंटु रुपनर,भैय्या राऊत,काका जाधव,वक्ते साहेब यांनी काम पाहिले तसेच पोलीस निरीक्षक मनिष पाटील,ए.पी.आय. कोळेकर व पी.एस.आय.अफरोज पठाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Most Popular

error: Content is protected !!