भैय्यासाहेब तांगडे | वडवणी
बीड जिल्ह्यात बहुचर्चित ठरलेल्या वडवणी नगर पंचायतीचा आज निकाल लागला असून यात राष्ट्रवादी आणि आघाडीच्या एकुण ९ जागा तर भाजपाच्या ८ जागा आल्या असून हि निवडणूक खूद्द आ.प्रकाश सोळंके यांनी प्रतिष्ठेची बनवली असून जनतेच्या जनाधाराने त्यांना काटेवर पास केल्याचे या निकालवरुन दिसून येत आहे. वडवणी नगर पंचायत निवडणूक हि प्रामुख्याने भाजपा आणि राष्ट्रवादी पक्षात झाली आहे.यामध्ये प्रभाग एक मधून बाबुराव पोटभरे यांचे खंदे समर्थ असणारे आणि यांच्या संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबा वाघमारे यांच्या मातोश्री सौ.द्रोपदी भगवान वाघमारे यांनी राष्ट्रवादी कडून निवडणूक लढवली असून त्यांनी भाजपाच्या एकनिष्ठ असणारे परमेश्वर उजगरे यांच्या कन्या राणी परमेश्वर उजगरे यांचा ५३ मतानी दणदणीत पराभव केला आहे.तर प्रभाग दोन मधून भाजपाचे युवराज असणारे बाबरी मुंडे यांच्या मातोश्री मंगलताई राजाभाऊ मुंडे यांनी राष्ट्रवादीचे व धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक सुग्रीव मुंडे यांचा दणदणीत पराभव केला.प्रभाग तीन मधून माजी.आ.केशवराव आंधळे यांचे भाच्चे व युवा नेते सतिष बडे यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली परंतु भाजपाच्या सचिन सानप यांनी तब्बल ६० मतानी विजय मिळवला आहे.प्रभाग चार मधून बाजार समितीचे माजी सभापती दिनकरराव आंधळे यांच्या पत्नी किस्किंदा आंधळे यांनी राजाभाऊ मुंडे यांच्या भावजई असणाऱ्या किसनाबाई मुंडे यांचा २६३ मतानी पराभव केला आहे.प्रभाग पाच मधून राष्ट्रवादीचे नेते भारत जगताप व शेषेराव जगताप या दोन्ही बंधूने एकतर्फी विजय मिळविला.प्रभाग सहा मधून भाजपाचे उमेदवर गिन्यदेव वालू राठोड यांचा फक्त पाच मतानी विजय झाला आहे.या ठिकाणी आघाडीचे नागुराव शाहु राठोड यांचा पराभव झाला आहे.प्रभाग सात मध्ये आघाडीचे जमाले बंधूचा पराभव झाला असून आघाडीचे पूरस्कृत उमेदवार बन्शी केशवराव मुंडे यांचा विजय झाला आहे.आठ मध्ये राष्ट्रवादीचे जगताप बंधूच्या मातोश्री यांना पराभव स्विकारावा लागला याठिकाणी भाजपाच्या महताबी पठाण यांना विजय मिळाला प्रभाग नऊ मधून आघाडीचे पुरस्कृत अस्लम कुरेशी यांचा विजय झाला प्रभाग दहा मधून भाजपाच्या मिराबाई भिमराव उजगरे यांना गुलाल लागला तर राजकारणातील किंग ठरलेले भानुदास उजगरे यांचा पराभव झाला आहे.प्रभाग अकरा मधून राष्ट्रवादीच्या नेहा नागेश आळणे तर प्रभाग बारा मधून भाजपाचे मिरा सुधीर ढोले तर तेरा मधून राष्ट्रवादीचे अंकुश वारे यांचा पराभव झाला असून भाजपाचे हरिदास किसन टकले यांचा विजय झाला.प्रभाग चौदा मधून मिनाक्षी संभाजी शिंदे या निवडून आल्या आहेत.प्रभाग पंधरा मधून भाजपाच्या रुपिका विनय नहार निवडून आल्या आहेत.प्रभाग सोळा मधून आघाडीच्या रंजना नागनाथ डिगे निवडून आल्या आहेत.तर प्रभाग सतरा आणि भाजला खतरा ठरला असून या जागेवर युवा नेते राहुल घाडगे यांच्या मातोश्री उषा उत्तम घाडगे यांनी एकतर्फी विजयरथ खेचून आला आहे.या निवडणूकित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहा तर आघाडी पुरस्कृत तीन अशा एकुण ९ जागा तर भाजपाच्या आठ जागा निवडून आल्या असून बाबरी मुंडे एकटाच नडला भारी ठरला असा सुर जनतेमधून निघाला असला तरी निवडून आलेल्या पैकी माजी आ.केशवराव आंधळे यांच्या गटाचे आणि पुरस्कृत कपबशी चिन्हावर तीन उमेदवार निवडून आले असाल्याने आंधळे गटाच्या भोवती सत्तेचा पेच असणार आहे.अस राजकिय विश्लेषक यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादीच्या ९ तर
भाजपाच्य ८ जागा
बाबरी मुंडे एकटाच
लढला भारी ठरला
केशवराव आंधळेंच्या
भोवती सत्तेचा पेच
बाबुराव पोटभरेंच्या
उमेदवाराला गुलाल
घाडगेंच्या विजयाने
राष्ट्रवादीचा तंबू मजबूत