Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडकेजकॉंग्रेस होम पिचवर पराभूत पाटील दाम्पत्याला जबरदस्त हाबाडा

कॉंग्रेस होम पिचवर पराभूत पाटील दाम्पत्याला जबरदस्त हाबाडा


नगरपंचायतवर महाआघाडीचे वर्चस्व
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या मुलीचा पभराव
भाजपाने उमेदवारच दिले नाही

सय्यद माजेद| केज
केज नगरपंचायतचा आज निकाल जाहीर झाला. यामध्ये कॉंग्रेस पक्षाला आपल्या होम पिचवर पराभव स्वीकारावा लागला. जनविकास आघाडीने कॉंग्रेसला जबरदस्त हाबाडा देत ८ जागेवर विजय मिळवला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची योग्य कामगिरी या निवडणुकीमध्ये दिसून आली नाही. फक्त पाच जागा राष्ट्रवादीला मिळवता आल्या. कॉंग्रेसला तीनच जागांवर समाधान मानावे लागले
असून दहा वर्षे सत्ता भोगूनही कॉंग्रेस पक्षाचे या निवडणुकीत बेहाल झाले. खा. रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोक पाटील आणि माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील यांनी प्रचारात शहर पिंजून काढला होता. शहरवासियांनी कॉंग्रेसला हात दाखवत झटका दाखवला. भाजपाला तर एकही उमेदवार या निवडणुकीत उभा करता आला नाही ही दुर्दैवी बाब म्हणावे लागेल.


नगरपंचायतच्या दोन टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्यानंतर आज निकाल घोषीत झाला. यामध्ये हारुण इनामदार यांच्या जनविकास आघाडीने केजच्या नगरपंचायतीवर झेंडा फडकवला. आघाडीला ८ जागा मिळाल्या. दहा वर्षांपासून शहराची सत्ता ताब्यात ठेवणार्‍या कॉंग्रेसला मात्र शहरवासियांनी चांगलाच झटका दाखवला. माजी मंत्री अशोक पाटील, खा. रजीनाताई पाटील यांना आपल्या होम पिचवर पराभव स्वीकारावा लागला. तिसर्‍यांदा शहर ताब्यात घेण्यासाठी पाटील दाम्पत्याने रात्रंदिवस प्रचार करत अनेक सभा आणि प्रचार फेर्‍या आयोजीत केल्या होत्या. मात्र शहरवासियांनी कॉंग्रेस पक्षाला नाकारून आघाडीला साद दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची कामगिरी काही सरस दिसली नाही. जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणुक लढविण्यात आली होती. राष्ट्रवादीला फक्त पाच जागांवर समाधान मानावे लागले. बजरंग सोनवणे यांनी आपल्या मुलीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यांचा पराभव झाला. भाजपाने तर एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केला जात आहे. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शरद झाळगे, साबळे, मेंडगे, सचीन देशपांडे, मंजुषा मिसकर यांनी काम पाहिले. ही मतमोजणी तहसील कार्यालयामध्ये घेण्यात आली. मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.


जनविकास आघाडीचे विजयी उमेदवार
वार्ड क्र. २ आशाबाई सुग्रीव कराड
वार्ड क्र. ७ सिता बनसोड
वार्ड क्र. ८ आलिया बेगम हारुण इनामदार
वार्ड क्र. १० रेशमा जलाल इनामदार
वार्ड क्र. ९ सुमित शिंदे
वार्ड क्र. ११ तरन्नुम गफुर इनामदार
वार्ड क्र. ४ सुशिल अंधारे
वार्ड १७ राजू इनामदार
वार्ड क्र. १६ पल्लवी ओमप्रकाश रांजणकर (अपक्ष)

राष्ट्रवादीचे
विजयी उमेदवार

वार्ड क्र. ५ गाढवे सोजरबाई
वार्ड क्र. ६ बालाजी जाधव
वार्ड क्र. १ अझहर इनामदार
वार्ड क्र. १४ शेख युनुस
वार्ड क्र. १५ भाऊसाहेब गुंड
कॉंग्रेसचे विजयी उमेदवार
वार्ड क्र. ३ आदित्य अशोक पाटील
वार्ड क्र. १३ पशुपतीनाथ दांगट
वार्ड क्र. १२ सोमनाथ गुंड

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!