Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडमाजलगावशिवसेना जिल्हाप्रमुखांच्या मतदारसंघात शिवसेनेचे वाजले की बारा, १७ पैकी अकरा जागेवर शिवसेनेला...

शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या मतदारसंघात शिवसेनेचे वाजले की बारा, १७ पैकी अकरा जागेवर शिवसेनेला उमेदवारच भेटले नाहीत; मिळालेल्या सहा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त


माजलगाव | दिनकर शिंदे
माजलगाव मतदारसंघातील वडवणी नगर पंचायतीची निवडणुक प्रक्रिया पुर्ण झाली आहे. महाराष्ट्‌ात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. अशा मोठ्या पक्षाला वडवणी सारख्या नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेला उमेदवार मिळत नसल्याचे दुर्देव असल्याचे जुने शिवसैनिक सांगताना दिसले. एकेकाळी महाराष्ट्‌ात, देशात शिवसेना म्हटलं की अंगावर शहारे येतील असा पक्ष होता परंतु आता शिवसेना म्हणजे मॅनेज की काय ? असं दबक्या आवाजात माजलगाव मतदारसंघात बोलले जात आहे. वडवणी नगर पंचायत निवडणुकीत सहा उमेदवार मिळाले परंतु त्यांनाही मतदानाचे तिन आकडे पार करता आले नाही तर त्यांचे डिपॉझिट जप्त झाले.


माजलगाव मतदारसंघातील वडवणी नगरपंचायतीच्या निवडणुकी प्रक्रियेत राष्ट्‌वादी कॉंग्रेस व भारतीय जनता पार्टी या दोन पक्षात सरळ लढत झालेली आज लागलेल्या निकालातुन दिसुन येत आहे. कारण दोन पक्षांमध्ये चुरशीची लढत असतांना शिवसेना पक्षाचे उमेदवार व पक्षाचे पदाधिकारी कुठे होते ? असा प्रश्न आहे. कारण नगर पंचायतीच्या सतरा जागेकरीता झालेल्या निवडणुकीत वार्ड क्रं. १, वार्ड क्रं. २, वार्ड क्रं. ३, वार्ड क्रं. ४, वार्ड क्रं. ६, वार्ड क्रं. ०७, वार्ड क्रं. ०८, वार्ड क्रं. ०९ वार्ड क्रं. १४, वार्ड क्रं. १५, वार्ड क्रं. १६, या अकरा वार्डात शिवसेनेला उमेदवार मिळाला नाही तर वार्ड क्रं. ५ मध्ये माळी प्रमिला यांना फक्त ०९ मते मिळाली, वार्ड क्रं. ११ मध्ये टकले यांना १९ मतदान, वार्ड क्रं. १२ मध्ये चाटे अश्विनी बाबासाहेब यांना २४ मते तर वार्ड क्रं. १३ मध्ये कुरकुटे रमेश राजेभाउ यांना फक्त ०५ मते मिळाली तर वार्ड क्रं. १७ मध्ये पाटोळ आशा ज्ञानेश्वर यांना फक्त ०७ मते मिळाली. या सहा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असल्याने शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या मतदारसंघात शिवसेनेचे वाजले की बारा अशी परिस्थिती वडवणी नगर पंचायतीच्या निकालामुळे निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!