Tuesday, May 17, 2022
No menu items!
HomeUncategorizedआष्टी पाटोदा शिरूर कासार मध्ये सत्ता राखली, पण जागा कमी झाल्या यात...

आष्टी पाटोदा शिरूर कासार मध्ये सत्ता राखली, पण जागा कमी झाल्या यात कसला मोठेपणा मिरवता – राष्ट्रवादीचे नेते माणिकभाऊ फड यांचा पलटवार

वडवणीचा गड ढासळला; केज मध्ये कमळाला शून्य जागा, या निकालावर पण बोललं पाहिजे – राष्ट्रवादीचे माणिकभाऊ फड यांचे आवाहन

परळी (दि. 19) —- : आष्टी पाटोदा आणि शिरूर कासार या तीनही नगरपंचायत निवडनूकी मध्ये भारतीय जनता पार्टीची पूर्वी एक हाती सत्ता होती ती सत्ता भाजपने येनकेन प्रकारे राखली परंतु तिथेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत यात माजी पालकमंत्री व त्यांचे कार्यकर्ते नेमका कसला मोठेपणा मिरवत आहेत? असा सवाल परळी मार्केट कमिटीचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकभाऊ फड यांनी उपस्थित केला आहे. आष्टी मध्ये पूर्वी एकही जागा नसलेल्या राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला 3 जागा मिळवता आल्या, एकहाती सत्ता असलेल्या पाटोदा येथे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे खाते उघडले, तिथे भाजपने मुस्लिम समाजाच्या मतांसाठी अजबच खेळी केली होती. शिरूर कासार नगर पंचायतीत 3 जागा राष्ट्रवादीच्या आल्या. तीनही ठिकाणी भाजपने आपली सत्ता स्थानिक नेतृत्वाच्या दहशतीत राखली, त्याचे मोठेपण माजी पालकमंत्री सांगत आहेत, हे हास्यास्पद असल्याचे माणिकभाऊ फड यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजपचा आर्थिक गड म्हणवला जाणाऱ्या वडवडणीत जनतेने अहंकाराचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेस व स्थानिक आघाडीला आशीर्वाद दिला आहे. भाजपला पैश्याचा पाऊस पाडून देखील वडवणीत सत्ता राखता आली नाही, असेही माणिकभाऊ फड म्हणाले. पूर्वी केवळ दोन जागा असलेल्या केज नगर पंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 जागा निवडून आल्या, मात्र तिथे कमळाचे उमेदवारच नव्हते, ही तर भाजपसाठी लाजिरवाणी बाब आहे, पण त्याचे देखील मोठेपण वाटत असेल, तर या भ्रमाच्या भोपळ्यात बसून भाजप नेतृत्वाने आगामी जिल्हा परिषद- पंचायत समित्यांचे स्वप्न नक्कीच पाहायला हरकत नाही, परंतु परळी नगर परिषद निवडणुकीत आपल्याला प्रत्येक वॉर्डात उभे करायला उमेदवार मिळतील का, याचाही अभ्यास करावा, अशी मिश्किल टिप्पणी देखील माणिकभाऊ फड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!