Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeक्राईमआरटीओ कार्यालयातील लाचखोरीचा पर्दाफाश

आरटीओ कार्यालयातील लाचखोरीचा पर्दाफाश


एसीबीची सर्वात मोठी कारवाई, रिपोर्टरने प्रकरण आणलं चव्हाट्यावर, मोटर निरीक्षक रविकिरण
भडला उमरगा चेक नाक्यावरून उचललं, खासगी हस्तक वसुलीबाजाला कार्यालयातून ताब्यात घेतले, एसीबीच्या कारवाईने खळबळ, भडच्या बीड आणि बार्शी तालुक्यातील गावात छापा

बीड (रिपोर्टर) बीडच्या आरटीओ कार्यालयात वसुलीसाठी खासगी व्यक्तींची नियुक्ती केल्याचे वृत्त सायं.दैनिक बीड रिपोर्टरने १४ जानेवारीला प्रकाशीत करून आरटीओ कार्यालयातील लाचखोरी उघड केली होती तर समाजसेवक शेख बक्शु यांनी इथल्या लाचखोरीची तक्रार एसीबीसह थेट मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर खळबळ उडाली. आज सकाळी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून या प्रकरणात चार वाहनांचे प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्ती गायकवाड याला ताब्यात घेतले तर सहायक मोटार वाहन निरीक्षक रविकिरण नागनाथ भड यास थेट उमरगा चेकपोस्टवरून आज पहाटे ताब्यात घेतले. त्याच्या बीड आणि बार्शी तालुक्यातील मूळगावी एसीबीने छापे टाकून चौकशी सुरू आहे. या घटनेने आरटीओ कार्यालयातील लाचखोरात प्रचंड खळबळ उडाली आहे.


बीडच्या आरटीओ कार्यालयामध्ये लाच घेतल्याशिवाय कुठलेही काम होत नाही. कार्यालयाचे मुख्य (पान ७ वर)
आरटीओ हे औरंगाबादहून काम हाकतात, बीडच्या कार्यालयात येत नाहीत. अशा एक ना अनेक तक्रारींबरोबर येथील सहायक आरटीओंनी वसुलीसाठी खासगी इसम ठेवल्याचे वृत्त १४ जानेवारी रोजी सायं. दैनिक बीड रिपोर्टरने प्रकाशीत केले होते. त्यापाठोपाठ समाजसेवक शेख बक्शु यांनी याबाबतची थेट तक्रार एसीबीसह मुख्यमंत्र्यांकडे केली होती. याची गंभीर दखल लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने घेतली आणि आज हरकतमध्ये येत थेट आरटीओ कार्यालयात वसुली करणारा आरटीओचा हस्तक प्रवीण सीताराम गायकवाड यास ताब्यात घेतले. चार वाहनांचे प्रत्येकी पाचशे रुपये अशी दोन हजाराची लाच स्वीकारताना त्याला रंगेहात पकडले तर मोटारवाहन निरीक्षक रविकिरण भड यास आज पहाटेच थेट उमरगा चेकपोस्टवरून एसीबीने ताब्यात घेतले. सदरील प्रकार गंभीर असल्याने भड याच्या बीड आणि बार्शी तालुक्यातील गोडगाव येथे छापा मारून तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात येते. बीडच्या आरटीओ कार्यालयात खासगी व्यक्ती ठेवून वसुली करण्याचा धंदा हा सर्वसामान्य वाहनधारकांसह चालकांना अत्यंत त्रासदायक होता. आज आरटीओ कार्यालयात एसीबीने केलेल्या या कारवाईने लाचखोरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राहुल काडे, अप्पर पोलीस अधिक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधिक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार श्रीराम गिराम, भारत गारदे, अमोल खरसाडे, चालक म्हेत्रे यांनी केली.

हेच का व्यवस्थीत काम
सायं. दैनिक बीड रिपोर्टरने १४ जानेवारी रोजी बीडच्या आरटीओ कार्यालयातील वसुलीबाज धंद्याचा पर्दाफाश केला. परंतु आरटीओ यांनी दुसर्‍या दिवशी स्थानिक वर्तमानपत्रातून काहींना हाताशी धरून आरटीओ कार्यालयात अत्यंत व्यवस्थीत कामकाज होत आहे, कार्यालय किती स्वच्छ आहे, यासह इथे सर्व राजा हरिश्‍चंद्रच्या औलादी सत्य आणि अहिंसेच्या पद्धतीने काम करत आहेत, असे छापून आणले. मात्र नरकडी करण्याची सवय असलेल्या लाचखोरांचा चेहरा आज कारवाईनंतर समोर आला अन् रिपोर्टरचे वृत्त तंतोतंत खरे ठरले.

… ही असते खरी समाजसेवा
अन्याय करणार्‍यापेक्षा अन्याय सहन करणारा हा सर्वात मोठा गुन्हेगार असतो, असे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे. आरटीओ कार्यालयात सर्रासपणे लाचखोरी माणसे लावून वसुलीबाजी होत असताना याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले. रिपोर्टरने ते वृत्त समोर आणले तर सामाजिक कार्यकर्ते ऍड. शेख अमिर बक्शु यांनी या लाचखोरीची तक्रार देऊन समाजसेवा काय असते, अन्यायविरुद्ध कसे लढावे लागते हे दाखवून दिले. शेख बक्शु यांनी केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या धाडसामुळे अन्य लोक लाचखोरीविरोधात उभे राहतील.

Most Popular

error: Content is protected !!