Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeसंपादकीयमराठवाडयात पिछेहाट

मराठवाडयात पिछेहाट


नगर पंचायतच्या दोन टप्प्यात निवडणुका झाल्यानंतर काल त्याचा निकाल घोषीत झाला. या निवडणुकीत काही नेत्यांनी बाजी मारली. काहींना पटकी बसली. स्थानिकच्या निवडणुकांवर पुढचं राजकारण अवलंबून असतं, पण शंभर टक्के ह्या निवडणुकीवर लोकसभा आणि विधानसभेचं गणीत ठरत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधीवर ह्या निवडणुका अवलंबून असतात. त्यातच आपल्या प्रभागात कोणता पुढारी कामाचा आहे. त्याला निवडुन दिल्यास तो आपली कामे करील का? याचा विचार करुन मतदान होत असतं. दुसरी महत्वाची बाब म्हणजे आजच्या निवडणुका ह्या प्रचंड प्रमाणात खर्चीक झाल्या. साधा ग्रामपंचायत सद्स्य होण्यासाठी पैसे लागतात. इतर निवडणुकीत पैशाशिवाय पान हालत नाही हे वगळं सांगण्याची गरज नाही. काही मतदारांना पैशाची लालुच लागली. पुर्वीच्या निवडणुकीत तत्व पाळले जात होते. आज तत्व गुंडाळून ठेवण्यात मतदार आणि उमेदवार धन्यता माणुन पुढे चालू लागले. निवडणुकीत कोणत्या पक्षाने किती बाजी मारली याची चर्चा निकालानंतर होत असते. तशीच चर्चा काल झालेल्या मतमोजणीत नंतर होवू लागली.
नगर पंचायतच्या निवडणुका बड्या नेत्यांनी तितक्या गांर्भीर्याने घेतलेल्या नव्हत्याच. ह्या निवडणुका स्थानिकवर अवलंबून असतात, हे बड्या नेत्यांना माहित असतं. त्यामुळे प्रचारात कोणत्याच बड्या नेत्यांनी हजेरी लावलेली नव्हती. जे काही स्थानिकचे नेते होते. त्यांनी आप-आपल्या भागात प्रचार करुन निवडणुका गाजवल्या होत्या. मराठयात पुर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचं चांगलं प्राबल्य होतं, पण मध्यंतरीच्या काळात या तिन्ही पक्षाची विभागात बरीच घसरण झाली. याला कारण गट-तट आणि गेली पाच वर्ष राज्यात भाजपाची सत्ता होती. त्यामुळे काहींनी भाजपाची वाट धरली होती. मराठवाड्यात बहुतांश प्रस्थापीत नेते आहेत, ह्या प्रस्थापीत नेत्यांच्या भोवती राजकारण फिरत असतं. भाजपाच्या मराठवाड्यात बड्या नेत्या म्हणुन पंकजा मुंडे आहेत. प्रत्येक जिल्हयात आणि काही तालुक्यात भाजपाचे तुल्यबळ नेते आहेत. मग औरंगाबाद येथील केंद्रीय राज्य मंत्री कराड, लातूर येथील माजी मंत्री निलंगेकर सह आदींचा सहभाग आहे. मराठवाड्यात 102 जागा भाजपाने जिंकल्या. त्यानंतर राष्ट्रवादीने 94, काँग्रेस 80 आणि शिवसेना 74 जाग्यावर विजयी झाली. एमआयएमने 5 जागा मिळवल्या. वंचीतने 2 जागा जिंकल्या. रासप 5 आणि प्रहारने 6 जागा जिंकल्या आहेत. सगळ्याच पक्षाची कमी, जास्त प्रमाणात कामगिरी राहिली. राज्यात सत्तेत शिवसेनेचा मुख्यमंत्री असला तरी मराठवाड्यात सर्वत्र शिवेसना पॉवरफुल नाही. आमदारकीच्या निवडणुकीत शिवसेनेची आता पर्यंत सरस कामगिरी राहिलेली आहे. कारण ग्रामीण भागात शिवसेनेचा जास्त मतदार आहे. त्यामुळे स्थानिकच्या निवडणुकीत शिवसेनेला फटका बसला आसावा. ह्या निवडणुका सगळ्याच पक्षाने वेगवेगळ्या लढवलेल्या आहेत. काहींनी सोयीनूसार आघाडी करुन लढवल्या पण युती किंवा आघाडी करुन कुणीच निवडणुकीला समोरे गेलेलं नाही. शहरी भागाचा विचार केला तर शहरी भागात भाजपाचा मतदार वर्ग चांगला आहे. जनतेतून नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपालाच जास्त जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत मराठवाड्यात भाजपालाच जास्त जागा मिळाल्याने सत्ताधारी तिन्ही पक्षाला चपराख बसली. राष्ट्रवादी दुसर्‍या क्रमांकावर राहून या पक्षाने काही प्रमाणात आपली आब राखण्याचं काम केलं. शिवसेना चौथ्या स्थानावर गेल्याने मराठवाड्यातील शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी नेमकं करतात तरी काय असाच प्रश्‍न पडत आहे. तिन्ही पक्षाची पिछेहाट ही तिन्ही पक्षांना विचार करायला लावणारी आहे. ह्या निवडणुका होत नाही तोच येत्या काही दिवसात नगर पालिका आणि जि.प., पंस.च्या निवडणुका होत आहेत. ह्या निवडणुकीतून पुढील निवडणुकीचा अंदाज व्यक्त केला जात असतो. आगामी काळात निवडणुकीला समोरे जाण्यासाठी पुन्हा सत्ताधारी तिन्ही पक्षांना कंबर बांधून मैदान गाजवावे लागणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!