Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडटॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे, पण भाजपचा एकही मुख्यमंत्री नाही!

टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे, पण भाजपचा एकही मुख्यमंत्री नाही!


नवी दिल्ली (वृत्तसेवा) देशात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना एक मोठी बातमी आली आहे. महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीसाठी आणि खास करून उद्धव ठाकरेंसाठी चांगली बातमी आहे. देशात टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा समावेश आहे. एका सर्वेतून ही मोठी माहिती समोर आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे आणि सी व्होटरने ’मूड ऑफ द नेशन’ या आधारवर सर्वे केला. २०२२ हा अतिशय ताजा सर्वे आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? यातून समोर आले आहे. यात पहिल्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसर्‍या क्रमांकावर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन तिसर्‍या क्रमांकावर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चौथ्या क्रमांकावर आहेत. तर ५ व्या क्रमांकावर आहेत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, ६ व्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ७ व्या क्रमांकावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, ८ व्या क्रमांकावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि ९ व्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!