बीड (रिपोर्टर)ः- जुन्या सातबारा, फेरफार उपलब्ध व्हावे यासाठी तहसिल कार्यालयात फेरफार कार्यालय उपलब्ध करण्यात आले. गेल्या आठ दिवसापासून या कार्यालयात कार्यालय प्रमुख नसल्याने शेतकर्यांना फेरफार मिळत नाही. दररोज शेतकरी कार्यालयात चकरा मारत असतात. तहसिलदार यांनी या कार्यालयात होत असलेल्या अनागोंदी कारभाराविरोधात लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
शेतकर्यांना जुन्या सातबारा आणि फेरफारची कुठल्या ना कुठल्या कामासाठी गरज भासत असते. जुने सातबारा मिळण्यासाठी तहसिल कार्यालयात एका वेगळ्या स्टोअरची निर्मीती करण्यात आली. त्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले. गेल्या आठ दिवसापासून सदरील कार्यालयाचा प्रमुख गैरहजर असल्याने शेतकरी रोज कार्यालयात कागदपत्रासाठी येतात आणि कर्मचारी नसल्यामुळे परत जातात. शेतकर्यांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी तहसिलदार यांनी याकडे लक्ष घालून अनागोंदी कारभार करणार्या सबंधीत कर्मचार्यास योग्य त्या सुचना देवून शेतकर्यांची फरफट थांबवावी अशी मागणी केली जात आहे.