माजलगाव (रिपोर्टर) माजलगाव शहरापासुन जवळच असलेल्या अकरा पुनवर्सित गावामध्ये वाकडे विजेचे पोल, लोंबकळणा-या तारा, उघड्या विद्युत डिपी या सर्व प्रकारला ग्रामस्थ वैतागले असुन या संदर्भात विज वितरण कंपनीकडे लेखी तक्रारीकरूनही दुर्लक्ष केले जात असल्याने विज कंपनीचा कारभार म्हणजे आंधळ दळतंय..अन् कुत्रं पिठ खातयं या युक्तीप्रमाणे कारभार चालत आहे. पुनवर्सित गावामध्ये पावला पावलावर मौत का कुवा या उघड्या डिपी बनत आहेत.
माजलगाव धरणाच्या निर्मीतीमुळे माजलगाव शहरालगत असलेली पुनवर्सित गावे चिंचगव्हाण, देवखेडा, रेणापुरी, शेलापुरी, काडिवडगाव क्रं. २, भाटवडगाव, नागझरी, ब्रम्हगाव, नांदुर यासह अकरा खेडी आहेत. या अकराही गावामध्ये विज वितरण कंपनीच्या अधिका-यांच्या आणि कर्मचा-यांच्या निष्क्रीय धोरणांमुळे सतत विजेचा लपंडावाला सामोरे जावे लागतच आहे. त्याचबरोबर गावामधील विजेचे वाकलेले पोल, लोंबकळलेल्या विजेच्या तारा आणि उघडे डिपी बॉक्स या सर्व विज वितरण कंपनीच्या कारभाराला ग्रामस्थ वैतागले आहे. गावातील संतप्त नागरिकांनी संबंधित विज कंपनीच्या अधिकारी, कर्मचा-यांना वेळोवेळी लेखी आणि तोंडी तक्रार करून देखिल आजपर्यंत काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे विज कंपनीचा कारभार म्हणुन आंधळ दळतंय…कुत्रं पिठं खातयं….कारभार चालु आहे. या कारभारामुळे मात्र उघड्या डिपी, लोंबकळणा-या तारा, वाकडे पोल यामुळे या गावात पावला – पावलावर मौत का कुवा बनले आहेत. त्यामुळे ही सर्व कामे तात्काळ सुरू करावे आणि पुर्ण करावेत जेणेकरून होणारे आपघात टळणार आहेत. त्यामुळे या विद्युत डिपी, पोल, तारांची कामे तात्काळ करावेत अशी मागणी पुनवर्सित गावाच्या ग्रामस्थांमधुन होत आहे.