मुंबई (रिपोर्टर) मुंबईमधील ताडदेव भागातील एका २० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावर सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. इमारतीच्या अठराव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरातील नाना चौकातील गांधी रूग्णालयाच्या समोरील कमला बिल्डिंगला ही आग लागली आहे.
या दुर्घटनेत आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार एकूण १५ जण जखमी झाले असून, यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहेत, तर अन्य जणांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.