Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeक्राईममाजलगावचे एपीआय झोनवालांची इमानदारी, पाच लाखांची बॅग नातेवाईकांना सुपूर्द

माजलगावचे एपीआय झोनवालांची इमानदारी, पाच लाखांची बॅग नातेवाईकांना सुपूर्द


बीड (रिपोर्टर) अपघातस्थळी पंचनाम्यासाठी गेलेल्या पोलिसांना अपघात झालेल्या व्यक्तींची पाच लाखांची बॅग घटनास्थळी मिळून आली. ती पैशासह पोलिसांनी अपघातग्रस्त मयतांच्या नातेवाईकांना सुपूर्द करून इमानदारीची मिसाल भ्रष्ट आणि लाचखोर अधिकारी, कर्मचार्‍यां-समोर मांहली. त्या पोलिसांचे सर्वस्तरातून कौतुक होत असून कर्तव्यावर असताना सर्वसामान्य माणसांच्या जान आणि मालची जबाबदारी ही शासन-प्रशासन व्यवस्थेची असते, असे घटनेत नमूद आहे. त्यानुसार या दोन पोलिसांनी शासन-प्रशासन व्यवस्थेची योग्य दिशा या घटनेतून समोर आणली.

याबाबत अधिक असे की, परवा रात्री माजलगाव-तेलगाव रस्त्यावरील लहामेवाडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना जोराची धडक देऊन ते वाहन पसार झाले होते. या अपघातात दुचाकीवरील राजेंद्र सिंग बन्सीलाल राज पुरोहित, मनिषकुमार रामला सोहणी (रा. राजस्थान राज्य, ह.मु. माजलगाव) हे दोघे जण ठार झाले होते. या घटनेची माहिती माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय विजयसिंह झोनवाल आणि अन्य कर्मचार्‍यांना झाल्यानंतर ते घटनास्थळी डेरेदाखल झाले. अपघात पंचनामा करत असताना घटनास्थळावर त्यांना एक बॅग दिसली. ती बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये नगदी रोकड ५ लाख ५ हजार रुपये दिसून आली. सदरची रक्कम ही अपघातग्रस्तांची असल्याचे प्रथमदर्शी लक्षात आल्यानंतर एपीआय झोनवाल यांनी खातरजमा करत सदरील पैशाची बॅग मयतांच्या नातेवाईकांना जशास तशी सुपूर्द केली.

एकीकडे पोलिसांच्या लाचखोरीचे, हप्तेखोरीची चर्चा सातत्याने होत असते, पोलिसांकडे केवळ पैसे मागणारे कर्मचारी म्हणून पाहिले जाते, त्यांना हिनवले जाते मात्र एपीआय विजयसिंह झोनवाल यांनी पोलिसांची प्रतिमा उंचावणारी इमानदारी दाखविली. लोकशाहीच्या घटनेमध्ये जान आणि मालची जबाबदारी ही सर्वस्वी शासन-प्रशासन व्यवस्थेची असते, दुर्दैवाने अपघातात त्या दोघांचा मृत्यू झाला मात्र त्यांच्याकडे असलेले पैसे हे या अधिकार्‍याने आणि त्यांच्या टिमने नातेवाईकांना सुपूर्द करून इमानदारीची मिसाल समोर ठेवली. त्यामुळे बीड पोलिस दलाची मान उंचावली आहे. अशा अधिकार्‍यांना जिल्हा पोलिस अधिक्षकांकडून रिवॉर्ड देऊन सन्मानीत करायला हवे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!