Home Uncategorized पारधी समाजाच्या वृद्ध महिलेचा खून

पारधी समाजाच्या वृद्ध महिलेचा खून


नांदुरघाट येथील घटना; एएसपी पंकज कुमावत यांची घटनास्थळाला भेट, तपासासठी श्‍वानपथक दाखल
केज (रिपोर्टर) नांदूरघाट येथील गायरान जमीनीत राहणार्‍या एका ६० वर्षीय वृद्ध महिलेचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याची खळबळजनक घटना मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर घटनेची माहिती पोलिस प्रशासनाला झाल्यानंतर एएसपी पंकज कुमावत यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. या महिलेचा कोणी आणि कशासाठी खून केला याचा अधिक तपास पोलीस करत आहे.


सखूबाई बन्सी शिंदे (वय ६०) ही महिला नांदुरघाट येथील गायरान जमीनीमध्ये राहत होती. महिलेचा मुलगा आणि सून ऊसतोडणीला गेल्याने ती एकटीच होती. मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात मारेकर्‍याने सखुबाई हिचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर एएसपी पंकज कुमावत, सहायक पोलीस निरीक्षक मिसळे, पीएसआय दादासाहेब सिद्धे, पो.नाईक मेसे, भालेराव, पो.कॉ. नामदास, पो.कॉ. अहंकारे, मतीन शेख, पो.हे.कॉ. शिनगारे यांच्यासह नांदुर चौकीच्या पोलीस कर्मचार्‍यानंी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या महिलेचा कोणी आणि कशासाठी खून केला असावा याचा तपास केजचे पोलीस करत आहेत. दरम्यान या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.

error: Content is protected !!
Exit mobile version