Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडपाटोदा बेलखंडीची सेवा सोसायटी आ.संदिप क्षीरसागरांच्या ताब्यात

पाटोदा बेलखंडीची सेवा सोसायटी आ.संदिप क्षीरसागरांच्या ताब्यात


बीड (रिपोर्टर) पाटोदा बेलखंडी,कचरवाडी, दत्तनगर ता.बीड सेवा सहकारी सोसायटी राष्ट्रवादीचे युवा नेते आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या ताब्यात आली आहे. अटीतटीच्या लढतीत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या गटाचे गोरख वाळके हे पाटोदा बेलखंडीच्या सेवा सोसायटीचे चेअरमन झाले आहेत. सर्व नुतन संचालक चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा आ.संदिप भैय्या क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

बीड तालुक्यातील पाटोदा बेलखंडी,कचरवाडी, दत्तनगर ता.बीड सेवा सहकारी सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची निवडणुक पार पडली. चेअरमनपदी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या गटाचे गोरख साहेबराव वाळके तर व्हाईस चेअरमन पदी शिवसंग्राम गटाचे संजय माने यांची निवड झाली. संचालक म्हणून प्रभु बडगे, बाळासाहेब बडगे, हरिकिसन वणवे, मारोती जाधव, विलास माने यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचे तालुका दुध संघाचे अध्यक्ष विलास बडगे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या ताब्यात सेवा सोसायटी आणण्यासाठी या निवडणुकीत माजी सरपंच अमोल माने, प्रकाश शहाणे, विलास माने, पंडित माने, मच्छिंद्र माने, लक्ष्मण बांगर, दत्तात्रय वनवे, श्रीरंग वनवे, अर्जुन तुपे, राम जाधव आदींनी महत्त्वाची भूमिका निभावली. नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!