Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडमारहाणीत जखमी झालेल्या किशोर गरखुदेंचा मृत्यू

मारहाणीत जखमी झालेल्या किशोर गरखुदेंचा मृत्यू


बीड (रिपोर्टर) क्षुल्लक कारणावरून किशोर गुरखुदे यांना १६ जानेवारी रोजी पाच जणांनी लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. जखमी गुरखुदेंवर औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात काल आरोपींविरोधात ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
१६ जानेवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास शहरातील आयटीआयच्या पाठीमागील निवासस्थानाजवळ कपिल जोशी, लकी कंढरे, आकाश कंढरे, प्रथमेश घुले (सर्व रा. अंकुशनगर, बीड) यांनी किशोर नंदलाल गुरखुदे (रा. जव्हेरी गल्ली, वय ४३ वर्षे) यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने मारहशर करून गंभीर जखमी केले होते. जखमी गुरखुदेंवर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झाला.

Most Popular

error: Content is protected !!