Home बीड लग्नाला जाणारा ऍपेरिक्षा पलटला; पाच जण जखमी

लग्नाला जाणारा ऍपेरिक्षा पलटला; पाच जण जखमी


नेकनूर (रिपोर्टर) येळंबघाट येथून धारूरकडे लग्नाला जाणारा ऍपेक्षा रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. यामध्ये पाच जण जखमी झाले असून काही जणांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना आज सकाळी येळंबघाट-धारूर रोडवर घडली.


धारूर येथे आज लग्न समारंभ असल्याने येळंबघाट येथील काही नागरीक एका ऍपेरिक्षामद्ये बसून लग्नाला जात होते. धारूर रस्त्यावर चालकाचा ताबा सुटल्याने सदरील रिक्षा एका खड्‌ड्यात जावून पलटी झाला. यात लैला अख्तर शेख (वय ४०), सय्यद नुरा (वय ४५), शेख तय्यब (वय २६), पठाण रशीदाबी (वय ७०), वहीदा शेख (वय ४५) या पाच जणांना मार लागल्याने त्यांना उपचारासाठी नेकनूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.
error: Content is protected !!
Exit mobile version