Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeक्राईममारेकर्‍यास तात्काळ अटक करा नसता प्रजासत्ताकदिनी आत्महदन

मारेकर्‍यास तात्काळ अटक करा नसता प्रजासत्ताकदिनी आत्महदन


बीड (रिपोर्टर) वडवणी तालुक्यातील कुप्पा येथील संभाजी कारभारी वडचकर यांचा जमीनीच्या वादातून खून करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अद्यापही अटक केली नसून आरोपीस अटक न केल्यास २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा मयताच्या मुलींनी दिला आहे.
संभाजी वडचकर यांच्यावर जमीनीच्या वादातून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अद्यापही अटक केलेली नाही. ज्या दिवशी वडचकर यांचं निधन झालं, त्याच दिवशी मयताच्या मुलींनी आरोपींच्या अटकेसाठी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. यावेळी पोलीस अधिकार्‍यांनी आश्‍वासन दिले होते मात्र अद्यापपर्यंत आरोपी अटक झाले नाहीत. येत्या दोन दिवसात आरोपींना अटक न केल्यास २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालया-समोर आत्मदहन करण्याचा इशारा किर्ती संभाजी वडचकर आणि प्रिती संभाजी वडचकर या दोन मुलींनी दिला आहे.


वडवणी पोलीस करताहेत आरोपींची पाठराखण
वडचकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून मारेकर्‍यांनी अपघाताचा बनाव केला होता. त्यानंतर हे प्रकरण नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले मात्र मारेकर्‍यांनी वडवणी पोलिसांना हाताशी धरून अपघाताचा बनाव केला होता. त्यामुळे अद्याप मारेकर्‍यांना पोलीस अटक करत नाहीत, वडवणी पोलीस मारेकर्‍यांची पाठराखन केरत असल्यामुळे याचा तपास पोलीस अधिक्षकांनी करावा, अशी मागणी होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!