Home बीड अखिरी डाव, कोणाला भाव वडवणी, केजमध्ये सत्ता स्थापनेसाठी संघर्ष होणार; सोळंके, आंधळेंचे...

अखिरी डाव, कोणाला भाव वडवणी, केजमध्ये सत्ता स्थापनेसाठी संघर्ष होणार; सोळंके, आंधळेंचे विजयी सदस्य सहलीवर

; केजमध्ये आघाडीला बहुमतासाठी एक सदस्याची गरज
वडवणी/केज (रिपोर्टर) अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या वडवणी, केज नगरपंचायतींच्या निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी मातब्बरांकडून आखिरी डाव टाकण्यास सुरुवात झाली असून यात नेमका कोणाला भाव मिळतो आणि कोणाची सत्ता नगरपंचायतीवर स्थापन होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. वडवणीत आ. सोळंके, माजी आ. आंधळे यांच्या गटातील बहुमतातील ९ सदस्य निवडणूक निकालानंतर सहलीच्या नावाखाली अज्ञातवासात गेले आहे तर दुसरीकडे त्रिशंकू ठरलेल्या केज नगरपंचायतीत आघाडीचे नेते हारुण सनामदार यांचे सदस्यही सहलीवर आहेत. सत्ता स्थापनेसाठी त्यांना एका सदस्याची गरज असून अपक्ष असलेला सदस्य अज्ञातवासात असल्याने येथेही सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून आखिरी
डाव टाकला जात असल्याची चर्चा होत आहे.


राज्य पातळीवर बहुचर्चित ठरलेल्या बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींपैकी वडवणी आणि केज नगरपंचायतींचे निकाल अटीतटीचे लागले. वडवणीत राजााभऊ मुंडे विरुध्द आ. प्रकाश सोळंके, माजी आ. केशवराव आंधळे यांच्या आघाडीने बहुमतातल्या ९ जागा जिंकून वर्चस्व स्थापन केले. तोडाफोडीचा इतिहास असलेल्या भाजपाकडून आखिरी डाव टाकला जावू नये म्हणून निकालानंतर तात्काळ सोळंके-आंधळेंचे विजयी सदस्य सहलीवर गेले. सत्ता स्थापनेसाठी वडवणीत शेवटपर्यंत आखिरी डाव टाकले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून दोन्हीकडलेही नेते आपल्या सदस्यांबाबत सतर्क आहेत तर त्रिशंकू ठरलेल्या केज नगरपंचायतीत इनामदार यांच्या आघाडीला ८ जागा, राष्ट्रवादीला ५, कॉंग्रेस ३ तर अपक्ष एका जागेवर निवडून आल्याने येथे सत्ता स्थापनेसाठी कोणाकडेच बहुमत नाही, त्यामुळे आघाडीचे सर्व विजयी उमेदवार सहलीवर आहेत. त्यात अपक्ष अज्ञातवासात असल्याने येथील नगरपंचायत सत्ता स्थापनेची घोडदौड आघाडीवर सुरू असून दोन्ही नगरपंचायतींसाठी आखिरी डावात भाव कुणाला मिळतो याकहे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version