Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeकोरोनाजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सर्व झाडांना तारेचे कुंपन करा

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सर्व झाडांना तारेचे कुंपन करा

शिवाजीनगर पोलिसांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र
बीड (रिपोर्टर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या एका लिंबाच्या झाडावर आंदोलनकर्ती महिला चढली होती. या वेळी प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सर्वच झाडांना बारा फुटापर्यंत तारेचे कुंपण करावे, अशी मागणी शिवाजीनगर पोलिसांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.


दि. ८ नोव्हेंबर २०२१ व २६ डिसेंबर २०२१ रोजी अनिता बिभिशन बचुटे ही आंदोलनकर्ती महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढून बसली होती. या महिलेला झाडावरून काली उतरवण्यासाठी पोलीस प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागली होती. भविष्यात आंदोलनकत्यार्र्ंनी पुन्हा झाडावर चढून बसू नये, झाडावरून एखादा आंदोलनकर्ता पडू नये यासाठी आता शिवाजीनगर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सर्वच झाडांना बारा फुटापर्यंत तारेचे कुंपन करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

Most Popular

error: Content is protected !!