Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeकोरोनाजमेची बाजू : ऍडमिटपेक्षा आयसोलेशनची संख्या जास्त, जिल्ह्यात १ हजार ५४७ रुग्णांपैकी...

जमेची बाजू : ऍडमिटपेक्षा आयसोलेशनची संख्या जास्त, जिल्ह्यात १ हजार ५४७ रुग्णांपैकी १ हजार ४२६ बाधीत घरीच घेतात उपचार; बीड जिल्हा रुग्णालयात १० तर अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये केवळ १५ रुग्ण; व्हेंटीलेटरची एकाही रुग्णाला गरज नाही


बीड(रिपोर्टर) जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असल्याने प्रशासनासह नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण होत असतानाच सुखद माहिती समोर येत आहे. जिल्ह्यात एकूण १६०० च्या आसपास ऍक्टिव्ह रुग्णांपैकी तब्बल १४५० रुग्ण हे घरीच आयसीलेट होत उपचार घेत आहे तर बीड जिल्हा रुग्णालयात केवळ १० रुग्ण उपचार घेत असून यातील एकाही रुग्णाला व्हेंटीलेटरची गरज भासलेली नाही. तिकडे अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात एकूण तीन वॉर्डात १५ रुग्ण असून यामध्ये ४ गरोदर महिलांना कोरोनाची लागण झालेली आहे. यापैकी १० रुग्णांना एखाद दुसर्‍या लिटरने ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यामुळे सध्या रुग्ण वाढत असले तरी विषाणूची तीव्रता ही तेवढी भासत नाही. दुसरीकडे मात्र १७ जानेवारी ते २३ जानेवारीच्या दरम्यान दोन जणांचा मृत्यू झाल्याचा आकडा समोर आला आहे.


गेल्या २० दिवसांच्या कालखंडात एक अंकावर असलेला कोरोना बाधितांचा आकडा ३०० च्या आसपास गेला मात्र कालपासून पुन्हा हा आकडा २०० च्या आसपास दिसून येत आहे. बीड जिल्ह्यात एकूण कालपर्यंत १ हजार ५४७ रुग्ण ऍक्टिव्ह असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. यामध्ये १ हजार ४२६ रुग्ण हे घरीच आयसोलेशन होत उपचार घेत आहेत. १२१ रुग्ण हे जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असून बीड जिल्हा रुग्णालयात केवळ १० रुग्ण उपचार घेत आहेत. यातील एकाही रुग्णाला अद्याप पावेत व्हेंटीलेटरची गरज भासलेली नाही. तिकडे अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये एकूण ३ वॉर्डात १५ बाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ४ सिझर झालेल्या महिलांचा समावेश आहे. ११ रुग्णांपैकी काहींना एखाद दुसर्‍या लिटरने ऑक्सिजनची गरज भासत असल्याचे तेथील डॉक्टर खैरे यांनी रिपोर्टरला सांगितले. प्रत्यक्षात खासगी रुग्णालयासह अन्य कोविड सेंटरमध्ये शंभरच्या आसपास रुग्ण उपचार घेत असून ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे त्यातील एखाद दुसरा रुग्ण हा लस न घेतलेला दिसून आला आहे. ज्या रुग्णाने कोविडच्या दोन लस घेतलेल्या आहेत, असे बहुतांशी रुग्ण घरी आयसोलेट होत उपचार घेऊन कोरोनातून बाहेर पडत आहेत. मात्र १७ जानेवारी ते २३ जानेवारीच्या दरम्यान दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाकडून आलेल्या आकडेवारीतून दिसून येते. कोरोनाचा आकडा कमी-जास्त होत असला तरी बाधीत रुग्णांना होणारा त्रास तिसर्‍या लाटेत अत्यल्प असल्याचे दिसून येते.

आजचे
पॉझिटिव्ह

अंबाजोगाई – ४४
आष्टी – ०५
बीड – ४७
धारूर – ०७
गेवराई -०८
केज – २२
माजलगाव -१०
परळी – ११
पाटोदा – ०५
शिरूर – ०४
वडवणी – १४
एकूण तपासण्या १६६५
एकूण पॉझिटिव्ह १७७
निगेटिव्ह ९८८

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!