विपीन गुप्ता अनोळखी व्यक्ती विरोधात वडवणी पोलीसांत गुन्हा दाखल
वडवणी (रिपोर्टर) बजाज फायनान्स कंपनीमधून रिलेशनशिप मँनेजर बोलत आहे. असं भासवून तुम्ही मला अनेंडेक्स अँप व्दारे तूमचा पत्ता आणि डिटेल पाठवा मी तुम्हाला ई.एम.आय कॉंर्ड घर पोहच करतो असे सांगून साळींबा येथील गणेश हरिभाऊ जाधव यांच्या बँक खात्यातील एक लाख दहा हजार सूपूर्तगी करण्यास भाग पडून फसवणूक केल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी विपीन गूप्ता या अनोळखी व्यक्ती विरोधात वडवणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करणत आला आहे.
वडवणी तालुकतील सांळीबा येथील रहिवाशी असणारे गणेश हरिभाऊ जाधव हे दि.२१ ला घरी आसताना मोबाईलवर विपीन गुप्ता अनोळखी व्यक्तीचा फोन आला आणि म्हणाला,मी बजाज फानान्स कंपनीमधून रिलेशनशिप मँनेजर बोलत आहे. तुम्हाला ई.एम.आय.कॉंर्ड आँफर असून तुम्ही मला अनेंडेक्स अँपद्वारे तुमचा पत्ता व डिटेल पाठवा मी तुम्हाला तूमचे ई.एम.आय.कॉंर्ड घरपोच करतो असे सांगून गणेश जाधव याचे ओळखदर्शक वैशिष्ट् लबाडीने वापरुन त्यांच्या बँक खात्यातील एक लाख दहा हजार रुपये सूपूर्तगी करण्यास भाग पडून जाधव ांची फसवणूक केली म्हणून वडवणी पोलीस स्टेशन येथे गणेश हरिभाऊ जाधव वय-२९ वर्ष रा.साळिंबा व्यवसाय खाजगी नोकरी ांच फिर्यादीवरुन विपोन गूप्ता या अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा रं.नं.१६/२०२२ कलम ४२० भादवी कलम ६६ (सी) (डि) माहिती तंत्रज्ञान कादा अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून यांचा तपास एपीआ मिरकर करत आहेत.
बीडमध्येही महिलेला ७४ हजाराला फसवले
नागरीक ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात करत आहे. याचाच फायदा गुन्हेगार करत असून तुमचे के्रडीट कार्ड अपडेट करायचे आहे. एटीएमची लिमीट वाढवायची आहे. केवायसी अपडेट करायचे आहे असे विविध कारण काढून भामटे नागरीकांना फोन करुन लाखो रुपयांना गंडावत आहे. हे भामटे नागरीकांना ऍनीडेस्क डाऊनलोड करायचे सांगून त्याद्वारे नागरीकांची फसवणूक करतात. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अनिता संतराम तांदळे या नौकरदार महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांना एका अनोळखी इसमाने फोन करुन तुमच्या गुगल पे ची लिमीट वाढवून देतो त्यासाठी तुम्ही ऍनीडेस्क डाऊनलोड करा असे म्हटल्यानंतर ते ऍप डाऊनलोड केल्यानंतर महिलेच्या अंकाऊट मधील ७४ हजार ६७१ रुपये काढून घेत फसवणुक केली.