Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडप्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन


घरकुलासाठी पारधी समाजाचे कुटूंबाचे धरणे; न.प.सेवानिवृत्त महिला कामगारांचे आंदोलन; देवस्थान जमीन प्रकरणी कारवाई करण्यासाठी आमरण उपोषण
बीड (रिपोर्टर) वासनवाडी हद्दीत राहणार्‍या पारधी समाजाच्या कुटूंबाला घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीसाठी सदरील हे कुटूंब काही दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहेत. तर न.प.च्या महिला कामगारांना पेन्शनची रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी वृध्द महिला उपोषणाला बसल्या. पोथरा येथील इनामी जमिनीचे फेरफार रद्द करण्यात यावे. तसेच माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील फेरफार रद्द करावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. उद्या प्रजासत्ताक दिन असल्याने या दिनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असून या आंदोलनामुळे नगर रोडचा परिसर चांगलाच दणाणला होता.


वासनवाडी हद्दीमध्ये राहणार्‍या पारधी समाजाला कविता पवार कुटूंबियास हक्काची जागा उपलब्ध नसल्याने त्यांना घरकूलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीसाठी पवार कुटूंबातील सदस्य गेल्या काही दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहेत. वक्फ महामंडळाअंतर्गत येणार्‍या देवस्थान दर्गाह हजरत कोचकशहावली (शहेंशाहवली) या दर्गाहची इनामी जमीन पोथरा ता.बीड येथे असून सदरील जमिनीचे फेरफार व रजिस्ट्री रद्द करण्यात यावी यासाठी शेख वसीम हे उपोषण करत आहेत. माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील जमिनीचे फेरफार रद्द करावी यासाठीही शेख अब्बास हे उपोषणाला बसले आहे. बीड नगरपालिका अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या गयाबाई साबळे, अंतिकाबाई पवळे, द्रोपदाबाई खळगे, नानीबाई आरकडे यांना पेन्शनची रक्कम देण्यात यावी यासाठी सदरील या वृध्द जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. निवृत्त कर्मचारी मराठवाडा विभाग व बीड जिल्हा समन्वय समितीच्यावतीने विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. पिपल्स रिपब्लीकन पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. शासनने ऍट्रासिटी गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडेच कायम ठेवण्यात यावा. जिल्हा परिषद अंतर्गत अर्ज मागवलेल्या अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिस ८२ जागा तात्काळ भरण्यात यावा यासह इतर मागण्यासाठी अनिल तुरूकमारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. पाटोदा तालुकयातील एका शेतकर्‍याने कोटेशन भरूनही त्यास विजेची जोडणी करून दिली नसल्याने सदरील सरवदे नामक शेतकरी उपोषणाला बसले आहे. दरम्याान उद्या प्रजासत्ताक दिन असल्याने विविध मागण्यासाठी नागरिक आजपासूनच आंदोलन करत असून या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा परिसर दणाणून गेला होता.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!