बीड (रिपोर्टर) राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी थेट झाडावर चढत आंदोलक महिलांशी चर्चा केल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे बीडमध्ये सर्वत्र त्यांच्याच चर्चा रंगल्याचे दिसून आले. महिला कर्मचार्यांना कायमस्वरूपी कामगार म्हणून घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी बीड नगरपरिषदेच्या काही कंत्राटी महिला कामगार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज उपोषणाला बसल्या होत्या.
बीड नगरपालिकेत महिला कर्मचार्यांना कायमस्वरूपी कामगार म्हणून घेत नसल्याने दोन महिला कामगारांनी कंटाळून झाडावर चढत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होत्या. अशात बीडचे धनंजय मुंडे यांना त्या आंदोलक महिला झाडावर चढल्याचे दिसल्या. हे पाहून धनंजय मुंडेनी अधिकार्यांना चांगलेच सुनावले. या वेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागरही आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित होते. आमदार क्षीरसागर यांनी महिलांसोबत चर्चा करण्यासाठी थेट स्वतः झाडावर चढले आणि महिला कर्मचार्यांना झाडावरून खाली येण्यासाठी विनंती केली.
मी लोकप्रतिनिधी या नात्याने आपले प्रश्न सोडवण्यासाठी कायम तत्पर आहे. झाडावर चढून आत्महत्या करणे पर्याय नाही, मी स्वतः याप्रकरणी लक्ष देईल, असा शब्द क्षीरसागर यांनी महिला कर्मचार्यांना दिला. आमदार क्षीरसागर यांचे आश्वासन ऐकून दोनही महिला कर्मचारी झाडावरुन खाली उतरल्या आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
यानंतर धनंजय मुंडे यांनीही महिला कर्मचार्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या आणि समस्या जाणून घेतल्या. सोबतच लवकरच यावर तोडगा काढणार, असे आश्वासन सुध्दा दिले.