आष्टी / अक्षय विधाते
नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाचे काम आष्टीपर्यंत पूर्ण झाले असून मागिल महिन्यात खा.प्रतिमताई मुंडे यांच्या हस्ते हिरवा कंदील दाखवून आष्टी ते अहमदनगर रेल्वे हायस्पीडने धावली होती आता आष्टीकरांना मुंबईला जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार असून 4 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. लवकरच नियमित आष्टी ते मुंबई रेल्वे धावणार असल्याने बिडकरांचे स्वप्न साकार होणार आहे.
अहमदनगर -बीड-परळी रेल्वेमार्गाचे अंतर 261 किलोमीटर असून 1995 साली या रेल्वे मार्गाला तत्वतः मंजुरी मिळाली. मात्र, त्यानंतर विविध कारणांनी हे काम रखडले. नगर ते आष्टी या 60 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण होऊन मागिल महिन्यात या अंतरावर हायस्पीड रेल्वेची चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आली. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवडयात आष्टी ते मुंबई नियमित रेल्वे धावणार आहे. या रेल्वेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे याच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून समजली.