Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईअकार्यक्षम कृषी सहाय्यकाची बदली करा

अकार्यक्षम कृषी सहाय्यकाची बदली करा

माजी उपनगराध्यक्ष, सरपंचासह रांजणी ग्रामस्थांचे उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन


गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील रांजणी गावाला कृषी सहाय्यक म्हणून असलेले पी.बी.पवार हे अकार्यक्षम असून त्यांच्या नाकर्तेपणामुळे पोखरा योजनेतील अनेक कामे प्रलंबीत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत असून अशा अकार्यक्षम कृषी सहाय्यकाची तात्काळ बदली करावी या मागणीसाठी गेवराईचे माजी उपनगराध्यक्ष अमोल करांडे, रांजणीचे सरपंच राम जाधव, उपसरपंच बळी महाराज कदम यांच्यासह ग्रामस्थांनी उपविभागीय कृषी अधिकारी माजलगाव यांना निवेदन दिले आहे.


पोखरा योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना विविध योजना शासन देत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोठा फायदा होत आहे. मात्र त्यासाठी कृषी सहाय्यक म्हणून असलेल्या अधिकार्‍याने शेतकर्‍यांना वेळोवेळी मदत करून त्यांचे कामे करणे गरजेचे आहे. जर अकार्यक्षम कृषी अधिकारी असेल तर शासनाची पोखरा योजना प्रभावीपणे राबवता येत नाही. तालुक्यातील रांजणी येथे शासनाची पोखरा योजना कार्यान्वीत आहे. मात्र कृषी सहाय्यक म्हणून असलेले पी.व्ही.पवार हे अकार्यक्षम आहेत. ते गावात कधीच भेट देत नाहीत. शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत. त्यांची कामे वेळेवर करत नाहीत त्यामुळे गावात अनेक पोखराच्या योजना अर्धवट आहेत. या योजना राबवल्या तर गाव सुजलाम सुफलाम बनेल मात्र कृषी सहाय्यक असलेले पी.बी.पवार हे अकार्यक्षम अधिकारी असून त्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी रांजणी ग्रामस्थांनी माजलगाव येथील उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. यावेळी गेवराईचे माजी उपनगराध्यक्ष अमोल करांडे, रांजणीचे सरपंच राम जाधव, उपसरपंच बळी महाराज कदम, भारत सावंत, माजी सरपंच भारत करांडे, अर्जुन कदम, ग्रामपंचायत सदस्य गणेश करांडे, रामनाथ करांडे, मुनीर शेख, महारूद्र सावंत यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

अकार्यक्षम कृषी सहाय्यकामुळे
शेतकर्‍यांचे मोठे नुकसान-अमोल करांडे

रांजणी गावामध्ये पोखरा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. या योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍याची मोठी प्रगती होत आहे. मात्र रांजणी गावाला देण्यात आलेले कृषी सहाय्यक हे अकार्यक्षम आहेत. ते शेतकर्‍यांना वेळेवर भेटत नाहीत. त्यांच्यामुळे अनेक कामे अर्धवट राहिलेले आहेत. त्यांची तात्काळ बदली करून रांजणी गावाला कार्यक्षम कृषी सहाय्यक देण्यात यावा. अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष अमोल करांडे यांनी केली आहे.

कार्यक्षम कृषी सहाय्यक
मिळावा-सरपंच राम जाधव

पोखरा योजनेच्या माध्यमातून आमच्या गावात विविध योजना राबवल्या आहेत. मात्र काही योजना या अकार्यक्षम कृषी सहाय्यकामुळे अर्धवट राहिल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. या योजना केवळ आणि केवळ अकार्यक्षम कृषी सहाय्यकामुळे अर्धवट राहिलेले आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला कार्यक्षम कृषी सहाय्यक देण्यासाठी आम्ही उपविभागीय कृषी अधिकार्‍याकडे मागणी केली असल्याची माहिती रांजणीचे सरपंच राम जाधव यांनी दिली.

Most Popular

error: Content is protected !!