Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडआष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये अध्यक्षपद कसं ? धस म्हणतील तसं! केजचा प्रश्‍न मिटला,...

आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये अध्यक्षपद कसं ? धस म्हणतील तसं! केजचा प्रश्‍न मिटला, वडवणीत धुमशान


बीड (रिपोर्टर) जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या अध्यक्षपदांचे आरक्षण घोषीत झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी आपलीच वर्णी लागावी यासाठी नेतृत्वाकडे लॉबिंग सुरू असताना आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये ‘अध्यक्षपद कसं धस म्हणतील तसं’ असे उत्तर मिळून येत असले तरी दोन ते तीन लोक या तिन्ही शहरात उत्सुक असल्याचे सांगण्यात येते. केजमध्ये जनविकास आघाडीच्या काफिल्यात गेलेल्या काँग्रेसने अध्यक्ष पदाकडे दुर्लक्ष करत उपाध्यक्षपदावर समाधान मानून घेतल्याने त्याठिकाणी जनविकास आघाडीच्या सीमा बनसोड या अध्यक्षपदाच्या दावेदार मानल्या जात आहे तर बहुचर्चित आणि सर्वांचे लक्ष लागून असलेल्या वडवणीत राष्ट्रवादीचा काठेवरचा विजय अध्यक्षपदासाठीही प्रचंड रस्सीखेच करत असताना दिसून येत आहे. भाजपाकडून बाबरी मुंडेंच्या मातोश्रींचं नाव अध्यक्षपदासाठी समोर येत असतानाच सोळंके, आंधळे यांच्याकडे सरपंचपद आपल्यालाच मिळावं म्हणून आळणे, जगतापसह अन्य दोघांनी ताकद लावायास सुरुवात केली आहे.


आष्टी, पाटोदा, शिरूर या तिन्ही नगरपंचायतीत सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षीत झाल्या आणि स्थानिक नेत्यांनी अध्यक्षपद आपल्यालाच मिळावं यासाठी सर्वेसर्वा म्हणून पाहितले जाणार्‍या आ. सुरेश धसांकडे लॉबिंग केल्याचे वृत्त आहे. प्रथमदर्शनी आष्टीत जिया बेग आणि रेडेकर या दोन महिलांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत असून शिरूरमध्ये प्रतिभा पाटील, श्‍वेता देसरडा यांच्यासह अन्य एक नाव अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जाते. पाटोद्यात दोन ते तीन नावांची जोरदार चर्चा होत असली तरी या तिन्ही शहरांमध्ये ‘अध्यक्षपद कसं, धस म्हणतील तसं’ असे उत्तर मिळत आहे. केज नगरपंचायतीत काँग्रेसला सपाटून पराभव पत्कारावा लागला. केवळ तीन जागांवर समाधान मानणार्‍या खा. रजनीताई पाटील यांच्या पॅनलला हारुण इनामदार यांच्या आघाडीच्या दारात जावं लागलं. प्रजासत्ताकदिनी आदित्य पाटील, हारुण इनामदार यांनी पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. या ठिकाणी अध्यक्षपदासाठी हारुण इनामदार यांच्या विश्‍वासातल्या सीमा बनसोड यांचे नाव अग्रक्रमी घेतले जात आहे. इकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या वडवणीत राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोळंके आणि भाजपाचे तत्कालीन आमदार केशवराव आंधळे यांच्या पॅनलला 9 जागा मिळाल्या तर भाजपाला 8 जागांवर समाधान मानावे लागले. सत्ता स्थापनेसाठी सोळंके, आंधळेंकडे बलाबल असले तरी केजमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडेंनी केलेले वक्तव्याने येथील अध्यक्षपदाची निवडणूक अतितटीची करून सोडली.या ठिकाणीही अध्यक्षपदासाठी तीन ते चार जण दावेकरी असून सोळंके, आंधळे अध्यक्षपदासाठी कोणाचे नाव पुढे करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!