सोनगाव येथील शेतकर्यांची पोलीस अधीक्षकांकडे धाव
बीड (रिपोर्टर) बीड तालुक्यातील सोनगांव येथील शेतकर्यांनी आपल्या शेतात पिकवलेल्या शेवग्याच्या खरेदी केलेल्या मालाचे पैसे देण्यास टाळाटाळ करत बीड येथील रामप्रसाद सुंदरराव कोल्हे या व्यापार्याने सदरील शेतकर्यांना चाळीस हजार रुपयाला गंडा घातला असून या शेतकर्यांनी आता पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव घेत लेखी निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बीड तालुक्यातील सोनगाव येथील केशव बाबुराव घिगे , नारायण अरुण घिगे, महेश प्रल्हाद घिगे, बंकट आश्रुबा घिगे, अशोक आश्रुबा घिगे, दत्ता बाबुराव घिगे, बबन त्रिंबक मोहिते, गोविंद मिठु घिगे, विष्णु बाबुराव घिगे यांनी आपल्या शेतात शेवग्याची लागवड केलेली आसून गेल्या वर्षी हे शेवग्याचे पिक चांगल्या स्वरुपात आलेले होते. परंतु त्यावेळेस संपुर्ण महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना हा माल मार्केट मध्ये विकता येणे शक्य नव्हते. याच दरम्यान बीड येथील रामप्रसाद सुंदरराव कोल्हे हा शेवग्याच्या शेंगाचा व्यापारी सदरील शेतकर्यांच्या शिवारात आला व संपुर्ण मालाची पहाणी केली असता त्याने की, मी तुमच्या सर्वांचा माल खरेदी करतो परंतु मालाचे पेमेंट मी तुम्हाला माल विक्री केल्यानंतर लगेच देतो असे त्याने दिनांक ०४ मार्च २०२१ रोजी या सर्वांच्या शेतातील माल गाडीमध्ये भरुन नेला. दरम्यान दोन दिवसानंतर या शेतकर्यांनी त्याला पेमेंटची मागणी केली असता. आज पैसे नाही उद्या देतो असे म्हणत त्याने या शेतकर्यांना दोन महिने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर सर्व शेतकर्यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन, बीड या ठिकाणी त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याकरीता गेले असता तेथील ठाणेप्रमुख यांनी त्याला फोन केला व त्यास तुमच्या विरुध्द आमच्याकडे तक्रार नोंद होत आहे तुम्ही जर त्यांचे पैसे दिले ते हे प्रकरण पुढे वाढणार नाही अशी समज दिली असता त्याने एकूण रक्कम रुपये ३४,००० रुपयांचा चा बँक ऑफ बरोदाचा चेक (चेक क्र.००००३३) हा स्वराज्य ग्रुप या खात्याचा दिला. सदरील चेक आम्ही बँकेमध्ये वटविण्याकरीता टाकला असता सदरील स्वराज्य ग्रुप च्या खात्यावर रक्कम नसल्यामुळे सदरील चेक हा बॉन्स झाला असून त्यास भेटून वेळोवेळी पैशाची मागणी केली परंतु तो उडवाउडवीची उत्तरे देत असून या प्रकरणी आम्हला न्याय मिळावा यासाठी सर्व शेतकर्यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन देत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.