बीड (रिपोर्टर) तालुक्यातील आदर्श गाव म्हणून कोळवाडीचा प्रशासनाने सन्मान केला आहे. या आदर्श गावाने पुन्हा एक आदर्श घालून देण्यासाठी गावात बैठक घेतली असून सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पाडण्याचे ठरवले आहे.
प्रत्येक निवडणूकीत अमाप पैसा खर्च केला जातो. पैसा खर्च करूनही चांगले माणसं निवडून येत नाहीत. त्यामुळे आदर्श गाव कोळवाडीकरांनी पून्हा एक आदर्श घालून देण्यासाठी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी बैठक घेतली. या बैठकीमध्ये सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध घेण्याचे ठरवण्यात आले. यावेळी उपसरपंच तुळशीदास महाराज शिंदे, सोमीनाथ यादव, गोरख जाधव, राम सरकाळे, शिवलाल शिंदे, ज्ञानेश्वर चव्हाण, अशोक नांदे, राम ििंशदे, लहु शिंदे, हनुमान ढेरे, केशव ढेरे, रघुनाथ चव्हाण, बलभिम ढेरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना उपसरपंच तुळशीदास महाराज शिंदे म्हणाले की, आदर्श गाव कोळवाडी पून्हा एकदा एक नवीन आदर्श घालून देत आहे. आम्ही ग्रामस्थांची बैठक घेवून सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध घेणारआहोत. यासाठी संपूर्ण ग्रामस्थांचे सहकार्य मिळत आहे. हि निवडणूक सर्व पक्षीय बिनविरोध केली जाणार आहे.