Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडहजरत टिपू सुलतान यांच्या विरोधात वादग्रस्त पोस्ट टाकली महेश धांडे विरोधात गुन्हा...

हजरत टिपू सुलतान यांच्या विरोधात वादग्रस्त पोस्ट टाकली महेश धांडे विरोधात गुन्हा दाखल


बीड (रिपोर्टर) स्वातंत्र्यसेनानी हजरत टिपू सुलतान यांच्याबाबतीत सोशल मिडीयावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी बीड शहरातील महेश धांडे याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

हजरत टिपू सुलतान यांच्याबाबतीत रात्री महेश धांडे यांनी फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकली. या पोस्टनंतर अनेकांनी याबाबत संताप व्यक्त करत पोस्ट टाकणार्‍या विरोधात कारवाई करावी या मागणीसाठी अनेक जण बीड शहर पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून होते. रात्री उशिरा धांडे यांच्या विरोधात २९५(ए)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास एपीआय ढाकणे हे करत आहेत. दरम्यान वादग्रस्त पोस्ट टाकून समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सदरील धार्मिक तेढ निर्माण करणार्‍याविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी घेवून बीड शहरातील अनेक नागरिक शहर ठाण्यामध्ये गेले होते. याची दखल घेत पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी म्हणून तात्काळ धांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान या पोस्टमुळे शहरात काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!