Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडनाथापूरमध्ये दुकान फोडणारे चोरटे जेरबंद

नाथापूरमध्ये दुकान फोडणारे चोरटे जेरबंद


परभणी एलसीबीच्या तपासातून चोरीचा गुन्हा उघड; अन्य एक आरोपीच्या शोधात पोलिस
कुक्कडगाव (रिपोर्टर) नाथापूर येथील एका कपड्याच्या दुकानात ४ जानेवारी रोजी चोरीची घटना घडली होती. या चोरी प्रकरणात दोघा जणांना पोलिसांनी अटक केली असून अन्य एकाच्या शोधात पोलिस आहेत. चोरट्यास न्यायालयात हजर केले असताना चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावणी आली. हे चोरटे परभणी जिल्ह्यातील आहेत.


नाथापूर येथील शिवराज कलेक्शनमध्ये ४ जानेवारी रोजी चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. काही दिवसापूर्वी परभणी एलसीबीने कैलास सखाराम पवार (रा.लिंबा ता.पाथ्री) भगवान आव्हाड (रा.बाभळगाव ता.पाथरी) या दोघांना एका गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतले होते. या आरोपीची सखोल चौकशी केली असता त्यांनी नाथापूर येथील दुकान फोडल्याचे कबूल केले. त्यानुसार पाथ्री एलसीबीने पिंपळनेर पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्याकडे या दोन आरोपीला स्वाधीन केले. या दोघांचा तिसरा साथीदार अविनाश कदम हा फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. पिंपळनेर पोलिसांनी या आरोपींना कोर्टात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा अधिक तपास पीएसआय ढाकणे हे करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!