बीड (रिपोर्टर) परळी शहरातील सुर्वेश्वर नगर भागातील एक घर फोडून अज्ञात चोरट्यांनी पावणे सहा लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २५ जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी काल परळी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा झाला आहे.
इंदूबाई भगिरथ बद्दर (वय ४६) यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी घरातील दिवाणमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी २५ जानेवारी रोजी चोरून नेले. ते दागिने ५ लाख ७६ हजार रुपयांचे होते.
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.