Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeक्राईमतिंतरवणीमध्ये घरफोडी; सोन्या-चांदीचा ऐवज लंपास

तिंतरवणीमध्ये घरफोडी; सोन्या-चांदीचा ऐवज लंपास


बीड (रिपोर्टर) घराचे कुलूप तोडून घरातील दिवाणमध्ये ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना तिंतरवणी येथे २९ जानेवारीच्या रात्री घडली. याप्रकरणी चकलांबा पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भागवत आश्रुबा खेडकर हे शेतकरी तिंतरवणी येथील हिवराचा माल येथे आपल्या परिवारासह राहतात. ते २९ जानेवारी रोजीच्या रात्री जेवण करून एका रूममध्ये सर्व कुटूंबासह झोपले असता दुसर्‍या खोलीचा अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश करत दिवाणात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख असा एकूण ८४ हजार २६० रूपयाचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी खेडकर यांनी चकलांबा पोलिसात तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.ह.गाडे हे करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!